शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

कुणी बेपत्ता तर कुणी झोपलेले

By admin | Updated: November 18, 2014 23:02 IST

यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी पुसद विभागातील वन तपासणी नाक्यांवर मध्यरात्री अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी काही नाक्यांवर कर्मचारी नसल्याचे तर कुठे

यवतमाळ : यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी पुसद विभागातील वन तपासणी नाक्यांवर मध्यरात्री अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी काही नाक्यांवर कर्मचारी नसल्याचे तर कुठे कर्मचारी झोपलेले असल्याचे आढळून आल्याची माहिती आहे. गुरमे यांच्या या धाड मोहिमेने वन विभागात खळबळ निर्माण झाली आहे. मुख्य वनसंरक्षक गुरमे यांनी गेल्या काही दिवसांपासून वनवृत्तात प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन कामाचा धडाका लावला आहे. वन खात्याच्या यंत्रणेला हा अनुभव नवा आहे. कारण आतापर्यंत सहसा कार्यालयातूनच कारभार चालविला गेला. मात्र गुरमे प्रत्यक्ष पुसद, पांढरकवडा, यवतमाळ विभागातील जंगलांमध्ये, वन कार्यालयांमध्ये जाऊन आढावा बैठका घेत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी पुसद विभागातील वन नाक्यांची मध्यरात्रीनंतर तपासणी केली. या विभागात उमरखेड, धनोडा, शेंबाळपिंपरी, येलदरी, खंडाळा, मारवाडी, पारवा येथे वन तपासणी नाके आहेत. उमरखेडकडून येत असताना गुरमे यांनी या नाक्यांवर भेटी दिल्या. तेथील उपस्थितीची पाहणी केली. एवढेच नव्हे तर भेटीच्या वेळी आढळलेल्या स्थितीचे आपल्या मोबाईलमध्ये फोटोही काढले. व्ही.व्ही. गुरमे यापूर्वी २००६ ला पुसदचे डीएफओ होते. त्यामुळे या विभागातील व्यवस्था व जंगलाची त्यांना खडान्खडा माहिती आहे. त्यामुळे कुणाच्याही मदतीशिवाय ते या विभागात कुठेही धडक देऊ शकतात. पुसद विभागातील येलदारी आणि शेंबाळपिंपरी वगळता अन्य तपासणी नाक्यांवर पक्के बांधकाम व चांगली व्यवस्था आहे. खंडाळा येथे तर दांडा आडवा टाकून वाहनांच्या तपासणीची परवानगी आहे. मात्र प्रत्यक्षात ही तपासणी होत नाही. बहुतांश तपासणी नाक्यांवर दिवसा महिला कर्मचाऱ्यांची ड्युटी लावली जाते. रात्रीला पुरुष कर्मचारी हे तपासणी नाके सांभाळतात. नियमानुसार या कर्मचाऱ्यांनी नाक्यांवरून पास होणाऱ्या वाहनाचे क्रमांक लिहिणे, त्यातील साहित्याची तपासणी करणे, त्यात सागवान नाही याची खातरजमा करणे बंधनकारक आहे. परंतु प्रत्यक्षात कुठेही हे काम होत नसल्याचे सांगितले जाते. खंडाळा येथे वन वर्तुळाचे कार्यालय आहे. शिवाय तपासणी नाका, विजेची व्यवस्था आहे. मात्र त्यानंतरही तेथे रात्रीला कर्मचारी राहत नसल्याच्या तक्रारी आहे. अन्य नाक्यांचीही अवस्था या पेक्षा वेगळी नाही. येलदरी येथे सोलर लाईटची व्यवस्था आहे. गुरमे यांनी तपासणी नाक्यांची प्रत्यक्ष स्थिती नोंदविली. आता संबंधितांवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)