शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

‘मोदी आवास’चा कोणी घेतला सर्वाधिक लाभ?: तीन लाखांचे टार्गेट, पण ११ हजारच बांधकामे

By अविनाश साबापुरे | Updated: June 21, 2024 20:39 IST

घरकुल योजनेची धिमी गती

अविनाश साबापुरे,यवतमाळ : ओबीसी प्रवर्गातील गरिबांसाठी गेल्या वर्षी महाराष्ट्रात मोदी आवास घरकुल योजनेचा प्रारंभ करण्यात आला. वर्षभराचा आढावा घेतल्यास या योजनेतून सर्वाधिक घरकुलांचा लाभ गोंदिया जिल्ह्याने घेतला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात घरकुलांचे सर्वाधिक उद्दिष्ट असूनही त्यातुलनेत कमी बांधकामे झालेली आहेत. 

गेल्या वर्षी २८ जुलै रोजी या योजनेची सुरुवात करण्यात आली. वर्षभरात महाराष्ट्रात एकंदर तीन लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. प्रत्यक्षात तीन लाख ३१ हजार ९९५ गरिबांनी या योजनेसाठी नोंदणी केली. त्यातील दोन लाख ९९ हजार ३६८ लाभार्थ्यांना प्रशासनाकडून मंजुरी मिळाली. परंतु, पडताळणीत अनेकांचे खाते क्रमांक अयोग्य आढळल्याने केवळ दोन लाख ९० हजार ४८३ लाभार्थीच घरकुलासाठी पात्र ठरले आहेत. परंतु, या जवळपास तीन लाख लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ ११ हजार ३७५ जणांचेच घरकुल बांधून पूर्ण झाल्याचा योजनेच्या राज्य व्यवस्थापन कक्षाचा अहवाल आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विशाल ठाकरे यांना कक्षाने ही माहिती आरटीआय अंतर्गत उपबल्ध करून दिली आहे.

जिल्हा : उद्दिष्ट : घरकुल पूर्ण झाले

  • अहमदनगर : ४३५६ : १२९
  • अकोला : ७३५३ : ५३६
  • अमरावती : १४१७८ : १०६३
  • बीड : १६०४१ : १७१
  • भंडारा : ११०३३ : २३७
  • बुलडाणा : १७०५५ : १५६
  • चंद्रपूर : १०८७४ : २१६
  • छत्रपती संभाजीनगर : ५८१२ : १५६
  • धाराशिव : २२७४ : २६१
  • धुळे : ९७०९ : ५२
  • गडचिरोली : ६५४८ : ६७१
  • गोंदिया : १४४२९ : १५२४
  • हिंगोली : ३३५४ : ७०
  • जळगाव : २९५३१ : ४०६
  • जालना : ८४९६ : २०६
  • कोल्हापूर : २०३१ : २०
  • लातूर : ६३१८ : १६६
  • नागपूर : ६७४७ : २७२
  • नांदेड : २३५९८ : १४५३
  • नंदूरबार : २८७६ : ५१
  • नाशिक : ६९८१ : ७६
  • पालघर : ४५८ : १९
  • परभणी : १३५९६ : ४५१
  • पुणे : १५२१ : २७
  • रायगड : २४५६ : १५७
  • रत्नागिरी : ६३५६ : १३८
  • सांगली : १९५८ : १६३
  • सातारा : १७७७ : ३३६
  • सिंधुदुर्ग : १३०८ : ८२
  • सोलापूर : ११०१९ : २९५
  • ठाणे : २५३८ : २३
  • वर्धा : ४९६५ : ३७८
  • वाशिम : १२४५५ : ६१९
  • यवतमाळ : २९९९९ : ७९५
  • एकूण : ३००००० : ११३७५

तीन वर्षात १० लाख घरकुले कशी होतील?२०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्र्यांनी मोदी आवास योजनेची घोषणा केली. त्यानंतर २८ जुलैपासून ही योजना अमलात आली. त्यानुसार, डोंगराळ दुर्गम भागात प्रती घरकुल १ लाख ३० हजार तर सर्वसाधारण क्षेत्रात १ लाख २० हजार रुपये दिले जाणार आहे. तीन वर्षात राज्यातील तब्बल १० लाख ओबीसीेना या योजनेतून घरकुल देण्याची घोषणा करण्यात आली होती. २०२३-२४ मध्ये तीन लाख, २०२४-२५ मध्ये तीन लाख आणि २०२५-२६ मध्ये चार लाख घरकुले बांधकाम करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यासाठी १२ हजार कोटींचा भार राज्य शासन उचलणार आहे. परंतु, पहिल्याच वर्षात केवळ ११ हजार घरकुले बांधता आलेली आहेत. तर १० लाख घरकुलांचे उद्दिष्ट कसे पूर्ण होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ