शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकाऱ्यांचे हात जेव्हा दगडधोंडे उचलतात..!

By admin | Updated: May 23, 2017 01:20 IST

अधिकाऱ्यांनी खुर्चीवरून आदेश द्यायचे आणि कर्मचाऱ्यांनी राबायचे... हाच शासकीय कार्यालयांचा शिरस्ता. पण कर्मचाऱ्यांनी हाक दिली ...

टंचाईविरुद्ध शिक्षक सरसावले : खैरगावात श्रमदानातून उभारले दोन बंधारे, वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अधिकाऱ्यांनी खुर्चीवरून आदेश द्यायचे आणि कर्मचाऱ्यांनी राबायचे... हाच शासकीय कार्यालयांचा शिरस्ता. पण कर्मचाऱ्यांनी हाक दिली आणि अधिकारी धावून आले, हा अपूर्व प्रसंग रविवारी खैरगावात अनुभवायला मिळाला. उन्हाळी सुटीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शिक्षक सरसावले आणि त्यांच्या प्रोत्साहनासाठी शिक्षणाधिकारी पोहोचल्या. स्वत: हाती दगडधोंडे घेऊन बंधारा बांधला. अधिकारी-कर्मचाऱ्यांमधल्या ‘अंतरा’चा बंधारा तोडला!यवतमाळ जिल्ह्यातील खेड्यांमध्ये ४४ अंशांचे तापमान आणि बादलीभर पाण्यासाठी घमासान, अशी भीषण स्थिती आहे. अशा १२६ खेड्यांनी आमीर खानच्या ‘वॉटर कप स्पर्धे’त भाग घेऊन श्रमदान सुरू केले आहे. गावकरी गावासाठी झटत आहेत. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी ‘सेलिब्रिटी’ येत आहेत. पाण्यासाठी परिस्थितीशी झुंजणाऱ्या खेडूतांसोबत आपणही श्रमदान केले पाहिजे, या विचारातून काही शिक्षक राळेगाव तालुक्यातील खैरगाव येथे रविवारी सकाळी साडेसहा वाजता पोहोचले. ही वार्ता कळताच प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनीही खैरगावात धाव घेतली. दिवसभर त्यांनी शिक्षक, गावकऱ्यांसोबत श्रमदान केले. विशेष म्हणजे, येथे दररोज श्रमदान करणाऱ्या योगीता भोयर आणि मयुरी घोटेकर या दोन विद्यार्थिनींसोबत त्या राबल्या. जलसंवर्धनाच्या कामाचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या गावातील तरुणांच्या मार्गदर्शनात श्रमदान करण्यात आले. गावालगतच्या टेकडीवरून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधण्याचे ठरले. शिक्षक आणि शिक्षणाधिकारी कामाला लागले. काहींनी टेकडीवरील मोठ-मोठे दगड खाली टाकायचे आणि दुसऱ्या चमूने ते गोळा करून बंधारा बांधायचा. दिवसभर चाललेल्या या श्रमातून खैरगावात दोन बंधारे उभे राहिले आहेत. शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविला गेला. यात शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, विक्रीकर निरीक्षक आनंद पाटेकर, हिमांशू पाटेकर, कार्तिक पाटेकर, परिषदेचे अध्यक्ष सतपाल सोवळे, सचिव गजानन पोयाम, कार्यालय मंत्री किशोर उईके, सुरेंद्र दाभाडकर, दिलीप कुडमेथे, मिलिंद सोळंके, रवींद्र वानखडे, उपसरपंच गजानन ढाले, ग्रामसेवक झिलपे, पाणी फाऊंडेशनचे बंडू खुळे, प्रकाश उरकुडे, स्वप्नील खुळे आदींनी श्रमदान केले.