शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

तुमचं आमचं नातं काय? जय भवानी, जय शिवराय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 21:59 IST

शिवजयंतीनिमित्त रविवारी यवतमाळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निघालेल्या सर्वधर्मसमभाव रॅलीने लक्ष वेधले.

ठळक मुद्देशिवजयंतीचा जल्लोष : जयघोषाने आसमंत दणाणला

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शिवजयंतीनिमित्त रविवारी यवतमाळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निघालेल्या सर्वधर्मसमभाव रॅलीने लक्ष वेधले. तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय अशा जय घोषाने आसमंत दुमदुमले.स्थानिक माळीपुऱ्यातील शिवजयंती उत्सव समिती आणि शिवाजी मंडळ यवतमाळ यांनी रविवारी तिथीनुसार शिवजयंतीचे आयोजन केले होते. पहाटे शिवजन्माचा पाळणा म्हणण्यासाठी शिवभक्तांनी माळीपुऱ्यात गर्दी केली होती. पहाटे शिवरायांचा जन्मोत्सव विश्वमांगल्य सभा भगिनींच्या उपस्थितीत झाल्यानंतर प्रभातयात्रा काढण्यात आली. विविध चौकांमध्ये रॅलीचे स्वागत करण्यात आले. यामध्ये आबाल वृद्धांसह महिला, युवती सहभागी झाल्या होत्या. शिवजयंतीनिमित्त दौैैड स्पर्धा झाली. सायंकाळी शोभायात्रा निघाली. यामध्ये शिवरायांच्या इतिहासाला उजाळा देणाऱ्या विविध झाँकी होत्या.सहपालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. नगराध्यक्ष कांचन चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंंगळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, उपस्थित होते.बसस्थानक चौकाजवळील शिवतिर्थावर पहाटेपासून शिवभक्तांची गर्दी झाली होती. शिवप्रेमींनी या ठिकाणावरून सर्वधर्मसमभाव रॅली काढली. स्थानिक डा.मा.म आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंती साजरी केली. आयुर्वेदिक महाविद्यालय, शिवाजी उद्यान ते शिवतिर्थ अशी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी निमा स्टुडंट फोरमचे अध्यक्ष डॉ. सूरज दहात्रे, डॉ. राहुल पवार, डॉ. अक्षय शिकारे, डॉ. स्वप्नील अनाळकर, डॉ. गौरव चौधरी, डॉ. सुशिल गर्जे, डॉ. समीक्षा बांगडे, राहुल बांडे, अरूण मोरे आदी उपस्थित होते. कृष्णा पुसनाके, संजय देठे, अब्दुल साजीद, अभिजित नानवटकर, विकास पवार, गुणवंत गणवीर, सुनिता पारखे, अजय गोडबोले, पराग बारले, सय्यद जब्बार , इम्रान अली, रियाज अली, हसनभाई, अभिजित गावंडे, संदीप भिसे, प्रणय डोईजड, अंकुश खोपडे आदींनी रॅलीच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

टॅग्स :Shivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८