शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

नीलेश पारवेकरांची स्वप्नपूर्ती हीच का?

By admin | Updated: October 11, 2014 23:14 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुलाला यवतमाळची उमेदवारी मिळावी यासाठी हट्ट धरला होता. प्रसंगी एबी फॉर्मवर स्वाक्षरी करणार नाही, अशी भूमिकाही घेतली होती. वास्तविक

यवतमाळ : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुलाला यवतमाळची उमेदवारी मिळावी यासाठी हट्ट धरला होता. प्रसंगी एबी फॉर्मवर स्वाक्षरी करणार नाही, अशी भूमिकाही घेतली होती. वास्तविक नंदिनी नीलेश पारवेकर यांची उमेदवारी निश्चित झाली होती. मात्र माणिकरावांच्या भूमिकेमुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही. आता ते नीलेश पारवेकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी मतांचा जोगवा मागत आहेत. नंदिनी पारवेकर यांचे तिकीट कापणे हीच नीलेश पारवेकरांची स्वप्नपूर्ती का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने येथे उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, नगरसेवक सुमित बाजोरिया यांनी शनिवारी घेतलेल्या संयुक्त पत्रपरिषदेत काँग्रेसला जाब विचारला. ते म्हणाले, काँग्रेससोबत पालिकेतील एकही नगरसेवक नाही, ही बाब यावेळी प्रत्येकाचे नाव घेवून सांगण्यात आली. राष्ट्रवादीने प्रचारात आघाडी घेतल्याने काँग्रेस उमेदवाराने धास्ती घेतली. त्यामुळे तथ्यहीन आरोप केले जात आहे. राष्ट्रवादीची माणिकरावांनी प्रत्येकवेळी अडवणूक केली. राष्ट्रवादीने विकास केला नाही, असा आरोप केला जातो. ही बाब माणिकरावांनी स्वत: तपासून पाहावी. स्वत:च्या घरासमोरील रस्ताही ते करू शकले नाही तर मतदारसंघाचा विकास कसा करणार. त्यांनी बोदेगाव साखर कारखाना, बोरीअरब येथील सूतगिरणी सुरू केली तर या भागातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले असते. मात्र ही बाबही ते करू शकले नाही. आमच्यावर धनदांडगे असल्याचा आरोप केला जातो. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे. माणिकरावांकडे केवळ शेती उत्पादन होते. शेतीतून एवढे उत्पन्न होत असेल तर मग शेतकऱ्यांनी आत्महत्याच केल्या नसत्या. केवळ शेती उत्पादनातून ते मोठे झाले असेल तर सर्व शेतकऱ्यांना त्यांनी हे तंत्र सांगावे, असे आव्हान यावेळी देण्यात आले. काँग्रेसच्या नगरसेविका सुरेखा माळवी, सुनील चमेडिया यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, सुरेश लोणकर, रमेश मानकर उपस्थित होते.