शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा येथे विहिरी ३०० अन् अर्ज अडीच हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 22:17 IST

तालुक्यात धडक सिंचन विहिरींची सोमवारी दुपारी सोडत काढण्यात आली. ईश्वरचिठ्ठीने लाभार्थी निवडण्यात आले.

ठळक मुद्देबचत भवनात सोडत : ५६ गावांत लक्षांक नसल्याने लाभच नाही

आॅनलाईन लोकमतदारव्हा : तालुक्यात धडक सिंचन विहिरींची सोमवारी दुपारी सोडत काढण्यात आली. ईश्वरचिठ्ठीने लाभार्थी निवडण्यात आले. यामध्ये दोन हजार ५९७ अर्जदार शेतकºयांपैकी केवळ ३०० जणांनाच सिंचन विहिरीचा लाभ मिळाला. तालुक्यात बहुतांश गावांमध्ये लक्षांक नसल्याने येथील अर्जदार शेतकरी विहिरीपासून वंचित राहिले आहे.धडक सिंचन योजनेच्या माध्यमातून कोरडवाहू शेतकºयांना सिंचन क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात या आर्थिक वर्षात लाभासाठी ८४ गावांतून दोन हजार ५९७ अर्ज आले होते. या अर्जातून लाभार्थी निवडण्यासाठी तालुकास्तरीय निवड समितीने स्थानिक बचत भवनात सोडत आयोजित केली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, उपविभागीय सिंचन अभियंता, तहसीलदार उपस्थित होते. ईश्वरचिठ्ठीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये ३०० शेतकºयांना सिंचन विहीर मिळाली आहे. आता वेळेत अनुदान प्राप्त झाल्यास शेतकºयांना पावसाळ्यापूर्वी विहीर खोदून तिचे बांधकाम करता येणार आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासकीय यंत्रणेने पाठपुरावा करावा व कामाची गती वाढवावी, अशा सूचनाही तालुकास्तरीय समितीच्यावतीने करण्यात आल्या. धडक सिंचन विहिरीच्या सोडतीसाठी संपूर्ण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने आले होते. या परिसरात दिवसभर शेतकºयांची वर्दळ होती.विहीर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचा हिरमोडसिंचन विहिरीच्या माध्यमातून हिरव्या शिवाराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक शेतकºयांचा ईश्वरचिठ्ठीत लाभ न मिळाल्याने हिरमोड झाला, तर सिंचन विहीर मिळाल्याने आनंद व्यक्त करणारेही लाभार्थी येथे होते. एकंदरच बचत भवन परिसरात कभी खुशी, कभी गम असे वातावरण पाहायला मिळत होते. लक्षांक नसलेल्या गावातील स्थिती अतिशय बिकट आहे. येथील शेतकरी अजूनही सिंचन विहिरींच्या प्रतीक्षेत आहेत.