शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विहीर बांधकामाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 22:11 IST

शेतकरी आत्महत्यांमागे कर्ज व नापिकीसोबतच सिंचन सुविधांचा अभाव, हे प्रमुख कारण स्पष्ट झाल्यानंतरही यवतमाळ जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढीबाबत शासन-प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्दे अनेक सिंचन विहिरी अर्धवट स्थितीत : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी आत्महत्यांमागे कर्ज व नापिकीसोबतच सिंचन सुविधांचा अभाव, हे प्रमुख कारण स्पष्ट झाल्यानंतरही यवतमाळ जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढीबाबत शासन-प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सिंचन सुविधांचे मूळ असलेल्या विहिरींच्या बांधकामाचाही असाच गोंधळ पुढे आला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत संपूर्ण राज्यातच विहिरींचे बांधकाम केले जात आहे. या योजनेंतर्गत सन २०१७-१८ मध्ये कुशल खर्चाकरिता केंद्र शासनाकडून ३४५ कोटी सहा लाख ६९ हजार रुपये राज्याला प्राप्त झाले आहे. तर राज्य शासनाने त्यात १०५ कोटी दोन लाख ३६ हजार एवढ्या निधीची आपला वाटा म्हणून भर घातली. असे एकूण ४५० कोटी नऊ लाख पाच हजार रुपये राज्यात सिंचन विहिरींसाठी उपलब्ध करून देण्यात आले.शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात १३ हजार १६५ वैयक्तिक सिंचन विहिरींची कामे हाती घेण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ सात हजार ३१३ विहिरी पूर्ण झाल्या आहे. पाच हजार ८५२ विहिरींची कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक विहिरी अर्धवट स्थितीत आहे. ५० टक्के काम पूर्ण झालेल्या विहिरींची संख्या १२५९ तर ७५ टक्के काम पूर्ण झालेल्या विहिरी १२५६ एवढ्या आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार व ग्रामपंचायतस्तरावर मजुुरांच्या मागणीप्रमाणे ही कामे केली जात आहे.यवतमाळ जिल्ह्यात केवळ विहिरींवर सात कोटी ८२ लाख ८४ हजार रुपयांचा निधी खर्च केला गेला आहे. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक काम झालेल्या विहिरींना आवश्यक कुशल निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून दिली जात आहे. पावणेचार हजार विहिरींसाठी निधीच शिल्लक नसल्याची व अनेक विहिरींचे काम निधीअभावी अतिशय संथगतीने सुरू असल्याची ओरड शेतकरी व राजकीय कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळते आहे.