शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

विश्वशांती रथयात्रेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 21:58 IST

तमिळनाडूतील कृष्णगिरी तिर्थक्षेत्रावरील पद्मामावती मंदिरातून निघालेली विश्वशांती रथयात्रेचे यवतमाळ शहरात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्दे११ राज्यांची परिक्रमा : भगवान पार्श्वनाथांचे ४२१ फूट उंच मंदिर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तमिळनाडूतील कृष्णगिरी तिर्थक्षेत्रावरील पद्मामावती मंदिरातून निघालेली विश्वशांती रथयात्रेचे यवतमाळ शहरात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. ही रथयात्रा देशातील ११ राज्यांची परिक्रमा पूर्ण करणार असून जगातील सर्वात उंच कृष्णगिरी तीर्थक्षेत्रावर भगवान पार्श्वनाथांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.कृष्णगिरी तीर्थामधील राष्ट्रसंत यतीवर्य डॉ. वसंत विजयजी म.सा. यांच्या मार्गदर्शनात ही विश्वशांती रथयात्रा काढण्यात आली आहे. या रथयात्रेचे सारथ्य आनंद सालच्या हे करीत आहेत. तमिळनाडूतील कृष्णगिरी तीर्थक्षेत्रावर ४२१ फुट उंच मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे. या ठिकाणी ३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान भगवान पार्श्वनाथाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. तत्पूर्वी २६ जानेवारी २०१९ ला ही विश्वशांती रथयात्रा परत तमिळनाडूत पोहोचणार आहे.या विश्वशांती रथयात्रेने आतापर्यंत तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश असा प्रवास करून महाराष्ट्रात आली आहे. राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, लातूर, पुणे, अहमदनगर, नांदेड, हिंगोली आणि वाशिम मार्गे ही रथयात्रा यवतमाळात आली आहे. ही विश्वशांती रथयात्रा वणी-चंद्रपूर मार्गे पुढे जाणार आहे.यवतमाळात रथयात्रेचे बुधवारी थाटात स्वागत करण्यात आले. वाघापुरातील दिगंबर जैन मंदिरातून निघालेली रथयात्रा शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत केसरिया भवनात विसर्जित झाली. या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रमही पार पडला. नेताजी चौकात रथयात्रेचे देव पूजन करण्यात आले. यावेळी महिला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी रथयात्रेतील भगवान पार्श्वनाथांचे दर्शन घेतले. या रथयात्रेत छोटे आणि मोठे दोन कलश ठेवण्यात आले आहे. आचार्यांनी अभिमंत्रित केलेला १०८ तीर्थातील वासक्षेप यामध्ये ठेवण्यात आला आहे. हा कलश शहरातील बांधवांकडे नेण्यात आला. त्या ठिकाणी जाप पार पडला.जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघटनेने नेताजी चौकात रथयात्रेचे स्वागत केले. यावेळी श्वेतांबर आणि दिगंबर जैन समाज बांधव उपस्थित होते. दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष शेखर बंड, प्रसन्न दफ्तरी, राजेंद्र खिवसरा, लहरभाई नागडा, संजय कोचर, वीरेंद्र मुथा, सचिन कोठारी, राजू जैन, भागचंद दर्डा, भवरीलाल बोरा, नंदकुमार बोरा, डॉ. रमेश खिवसरा, यग्नेश धोराजीवाला, मिनल सेठ, जित सेठ, अखिलभाई धरमसी, संदीप तातेड, विजय कोटेचा, दिलीप लोढा, विजू लोढा, कुमार नागडा, श्याम भंसाली, जैन महिला मंडळ, केसरिया महिला मंडळ, गोविंदभाई डाबरीवाल आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.