शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग स्वररागिनीच्या खांद्यावर कुटुंबाचा भार

By admin | Updated: April 2, 2017 00:26 IST

घरात अठराविश्व दारिद्र्य. यातच कुटुंबातील एक नव्हे दोन जन्मांध मुली. कुटुंबाचा गाडा ओढताना कायम दमछाक.

 सुनीताचे धाडस : नवतरुणांपुढे आदर्श फुुलसावंगी : घरात अठराविश्व दारिद्र्य. यातच कुटुंबातील एक नव्हे दोन जन्मांध मुली. कुटुंबाचा गाडा ओढताना कायम दमछाक. अशा परिस्थितीत स्वररागिनी दिव्यांग सुनीताने कुटुंबाचा भार उचलला. आई-वडिलांसह एका अंध बहिणीची सेवा करू लागली. तिचा हा आदर्श नवतरुणांपुढे आहे. बंदीभागातील चिखली वन येथील सुनीता ही दिव्यांग तरुणी. जन्मताच डोळे नसले तरी तिच्या कंठात मात्र कोकिळेचा वास. विविध स्पर्धा, विवाह समारंभ, भजनाच्या माध्यमातून ती कुटुंबासाठी पैसा गोळा करते. गणपत सूर्यवंशी असे तिच्या वडिलांचे नाव. बहीण वनमालाही दिव्यांग आहे. तिने बारावीपर्यंत शिक्षण घेतले. आई-वडिलांच्या मागे आपले कसे होईल, ही विवंचना. परंतु सुनीताला असलेल्या संगीताच्या आवडीतून वनमालाचा प्रश्न सुटला. सुनीताने बारावीपर्यंत शिक्षण घेऊन संगीत विशारद पदवी घेतली. वृद्धापकाळात आई-वडिलांचा आधार होऊन त्यांची सेवा करू लागली. आपल्या सुरेख कंठातून गाते तेव्हा प्रेक्षक मंत्रमुग्ध होते. (प्रतिनिधी) मानधनासाठी धडपड दिव्यांग वनमाला व सुनीताला शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतून मानधन मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे. वडील गणपतराव सूर्यवंशी यांनी उमरखेड तहसील कार्यालयाचे अनेकदा उंबरठे झिजविले. पंरतु त्यांना अद्याप मानधन सुरू झाले नाही. त्यामुळे या भगिनींना तत्काळ मानधन सुरू करावे, अशी मागणी होत आहे.