शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वजनमाप निरीक्षक कार्यालय हाकलतेय उंटावरून शेळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 21:14 IST

येथील नांदेपेरा मार्गावर असलेल्या वजनमाप निरीक्षक कार्यालयाकडून सध्या उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम सुरू आहे. या विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने व्यापाऱ्यांचे चांगलेच फावत असून अनेक ठिकाणी ग्राहकांची सर्रास लूट होत असताना संबंधित व्यापाऱ्यांच्या वजनमापांची पडताळणी करण्याचे कामदेखील या कार्यालयाकडून केले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.

ठळक मुद्देग्राहकांची लूट : वजनात फेरफार, अनेक ठिकाणी केला जातो दगडांचा वापर

म.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील नांदेपेरा मार्गावर असलेल्या वजनमाप निरीक्षक कार्यालयाकडून सध्या उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम सुरू आहे. या विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने व्यापाऱ्यांचे चांगलेच फावत असून अनेक ठिकाणी ग्राहकांची सर्रास लूट होत असताना संबंधित व्यापाऱ्यांच्या वजनमापांची पडताळणी करण्याचे कामदेखील या कार्यालयाकडून केले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.गंभीर बाब ही की, काही छोटे व्यावसायिक वजन करताना प्रमाणित वजनाऐवजी दगडांचा सर्रास वापर करीत आहे. यातून ग्राहकांची लूट केली जात आहे. एखाद्या ग्राहकाने यावर आक्षेप घेतल्यास व्यावसायिक व ग्राहकात वादावादीचे प्रसंगही घडून येत आहेत. अनेक व्यावसायिकांनी तर प्रमाणित वजनमापेच घेतली नसल्याचे दिसून येत आहे. मात्र या कार्यालयाकडून या व्यावसायिकांविरूद्ध कोणतीही कारवाई करण्यात आल्याचे दिसून येत नाही. या कार्यालयाने शहरात काही परवानाधारक एजंटांची नेमणूक केली असून त्यांना दुरूस्तकार असे गोंडस नाव देण्यात आले आहे. नियमानुसार कार्यालयातील जबाबदार अधिकाºयाने वजने प्रमाणित करताना प्रत्यक्ष उपस्थित राहणे गरजेचे आहे. परंतु हे दुरूस्तकार बाहेरच्या बाहेर वजने प्रमाणित करून देत असल्याचे एका जाणकाराने ‘लोकमत’ला सांगितले.गेल्या दोन वर्षांपासून कार्यालयातील प्रयोगशाळेत वजनांचे प्रमाणिकीकरण झालेच नसल्याचे सांगितले जाते. या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीदेखील चंद्रपुरातूनच कारभार पाहत असल्याची माहिती आहे. १५ दिवसातून एखादवेळी हा अधिकारी वणी कार्यालयात चक्कर मारतो. त्यांच्या गैरहजेरीत अनेक ग्राहक वजनाविषयीच्या तक्रारी घेऊन या कार्यालयात जातात. मात्र याठिकाणी अधिकारीच गैरहजर राहत असल्याने तक्रार करावी कुणाकडे, असा प्रश्न ग्राहकांना पडतो. या कार्यालयात हजेरी रजीस्टर ठेवण्यात आले आहे. मात्र त्यावर अन्य कर्मचाºयांच्या स्वाक्षºया असल्या तरी अधिकाºयांच्या मात्र स्वाक्षºयाच दिसून येत नाहीत.यासंदर्भात या कार्यालयातील वजनमापे निरीक्षक स.बा.कटके यांच्याशी संपर्क साधला असता, मी मागील १० दिवसांपासून रजेवर आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यालयाचा प्रभार पांढरकवडा येथील निरीक्षकांकडे देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या महिन्याच्या अखेर आपली सेवानिवृत्ती आहे. या विभागाचे संपूर्ण काम आॅनलाईन झाल्याने मी आपली उपस्थिती आॅनलाईनच दर्शवित असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मागीलवर्षी बाजार समितीत वजनकाट्यात फरक आढळून आल्याने स्थानिक शिवसेना नेत्याने या विषयात वजनमापे निरीक्षकांना चांगलेच धारेवर धरले होते. या कार्यालयाकडून केवळ खानापूर्ती करण्यासाठी नाममात्र कारवाया केल्या जातात. अनेक कारवायात एजंटमार्फत सेटींग केली जात असल्याचीही चर्चा आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन या कार्यालयाच्या कारभारात सुधारणा करण्याची मागणी आहे.