शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

वेअरहाऊस पद्धती विकसित होणे गरजेचे

By admin | Updated: October 26, 2015 02:29 IST

मराठवाड्यात वेअर हाऊस पद्धती बऱ्यापैकी रुजत आहे. विदर्भातही खासगी वेअरहाऊस पद्धती रुजणे आवश्यक आहे.

यवतमाळ : मराठवाड्यात वेअर हाऊस पद्धती बऱ्यापैकी रुजत आहे. विदर्भातही खासगी वेअरहाऊस पद्धती रुजणे आवश्यक आहे. याठिकाणी शेतकऱ्यांना आपला माल साठवता येईल आणि भाव वाढल्यावर आपला माल विकता येईल, असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्र परिषदेत केले. नगरपंचायतीच्या निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी पाशा पटेल आले असता पत्रकारांसोबत बोलत होते. यावर्षी सोयाबीनचा प्रचंड तुटवडा असल्याचे त्यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात नऊ लाख पाच हेक्टर क्षेत्रात खरिपाची सोयाबीनची पेरणी झाली आहे. देशात सर्वाधित सोयाबीनचे उत्पादन होणारे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश हे राज्य असून, यावर्षी महाराष्ट्रात ३७ लाख हेक्टरवर तर मध्यप्रदेशात ५९ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. परंतु प्रत्यक्षात २३ लाख मेट्रिक टन महाराष्ट्रात सोयाबीनचे उत्पादन होईल. ३० ते ४० टक्के उत्पादन सर्वत्र घटले आहे. देशातही १०० ते ११० लाख मेट्रीक टन सोयाबीनच्या उत्पादनाची अपेक्षा होती. परंतु आता ते ६१ ते ६२ लाख मेट्रिक टन वर आले आहे. सोयाबिनचा प्रचंड तुटवडा आहे. शेतकऱ्यांनी पाच ते सहा महिने तग धरल्यास सहा हजार रुपये प्रती क्विंटल सोयाबीनला भाव मिळू शकतो. कमी उत्पादनात जास्त भाव यावर्षी मिळू शकण्याची शकतो, असे पाशा पटेल म्हणाले. महाराष्ट्र शासनाने कडधान्य व तेलबियांना साठवणुकीसाठी निर्बंध घालण्याची अधिसूचना जारी केली आहे. परिपत्रकात कडधान्य व तेलबिया असा शब्द प्रयोग असल्यामुळे याचा फटका सोयाबीन व इतर तेल उद्योगास बसत आहे. गेल्या तीन-चार दिवसात सोयाबीनचे भाव ४०० रुपयांनी कमी झाल्याची कबुली त्यांनी दिली. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचेही पाशा पटेल यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)