हम होंगे कामयाब : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ३७ पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यभरातील ६ हजार ५०० उमेदवारांनी यात सहभाग घेतला. शारीरिक चाचणी आटोपल्यानंतर मंगळवारी ७१० पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. यवतमाळातील पळसवाडी कॅम्पमधील पोलीस मैदानात सकाळच्या सुमारास ही परीक्षा झाली. खुल्या मैदानात शिस्तबद्ध बैठकव्यवस्था होती. शारीरिक आणि बौद्धिक अशा दोन्ही कसोट्यांवर क्षमता सिद्ध करणाऱ्या तरुणांच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास होता.
हम होंगे कामयाब :
By admin | Updated: April 20, 2016 02:32 IST