शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘कन्टेम्प्ट’ झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 20:50 IST

नोकरभरतीसह विविध १६ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नोकरभरतीबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे मानले जात होते. परंतु, प्रत्यक्षात भरती लांबणीवर टाकली गेली. याच मुद्द्यावरून काही संचालकांनी आक्रमक भूमिका बैठकीत घेतली. बैठकीत मांडले जाणारे मुद्दे, होणारा विरोध प्रोसीडिंगवर येतच नाही, याकडे लक्ष वेधले गेले.

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँक : सहा संचालकांनी दिले पत्र, नोकरभरतीचा वाद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकरभरती प्रक्रिया राबवावी, त्यात होणाऱ्या विलंबामुळे न्यायालयाचा अवमान (कन्टेम्प्ट) झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, अशा आशयाचे पत्र जिल्हा बँकेच्या सहा संचालकांनी शुक्रवारी बँकेला दिले आहे. नोकरभरतीसह विविध १६ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नोकरभरतीबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे मानले जात होते. परंतु, प्रत्यक्षात भरती लांबणीवर टाकली गेली. याच मुद्द्यावरून काही संचालकांनी आक्रमक भूमिका बैठकीत घेतली. बैठकीत मांडले जाणारे मुद्दे, होणारा विरोध प्रोसीडिंगवर येतच नाही, याकडे लक्ष वेधले गेले. १०५ जागांबाबत उपस्थित केलेले मुद्दे तपासून पाहू आणि ४२ जागांच्या भरतीबाबत न्यायालयाला वेळ वाढवून मागू, अशी भूमिका बैठकीत घेतली गेली. मात्र, हा निर्णय एकमताने नसल्याचे सांगितले जाते. नोकरभरतीबाबत न्यायालयाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. ठरावीक मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्यानंतरही नियोजित वेळेत भरती प्रक्रिया पूर्ण केली जात नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाचा अवमान होण्याची भीती बैठकीत व्यक्त करण्यात आली. याच मुद्द्यावर भरतिप्रक्रिया लांबणीवर टाकण्याला सहा ते सात संचालकांनी तीव्र विरोध दर्शविला. हे करीत असताना न्यायालयाचा अवमान झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असे पत्रच सहा संचालकांनी बैठकीत दिले. मात्र, हे पत्र घेण्यास नकार दिल्याने अखेर बँकेच्या आवक-जावक विभागात हे पत्र देण्यात आले. एका संचालकाने मात्र आपला मौखिक विरोध कायम ठेवला. पत्र दिलेल्या संचालकांमध्ये जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अमन गावंडे, संचालक शंकरराव राठोड, संजय देशमुख, प्रकाश मानकर, प्रा. शिवाजी राठोड, बाबू पाटील वानखडे यांचा समावेश आहे. नोकरभरतीबाबत उद्या अवमानना कारवाई झाल्यास बँकेच्या २१ पैकी पत्र देणाऱ्या या सहा संचालकांची यातून सुटका होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.  कंत्राटींना कॅशिअर बनविण्याचा  प्रस्ताव बारगळला संचालक मंडळाच्या बैठकीत जिल्हा बॅंकेच्या नऊ हजार रुपये मासिक वेतन असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कॅशिअरचा प्रभार देण्याबाबतचा प्रस्ताव होता. मात्र संचालकांनी तीव्र विरोध केल्याने हा ठराव बारगळला. शेतकऱ्यांचा पैसा सुरक्षित ठेवायचा की नाही, कॅशिअरचा प्रभार न देण्याच्या अटीवरच कंत्राटींची नियुक्ती केली जाते, याकडे लक्ष वेधले गेले. आर्णी शाखेतील कोट्यवधींचा अपहार उघडकीस आल्यानंतरही बॅंकेचे पदाधिकारी गंभीर नाही, खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे,  यंत्रणेवर अंकुश नाही, स्वार्थापोटी खासगी बॅंकेसारखे व्यवहार केले जात असल्याचा आरोपही संचालकांमधून केला जात आहे. या प्रकरणाकडे जिल्हा बँकेच्या खातेदारांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

दिल्लीच्या एजंसीवर अधिक जोर  मागासवर्गीयांच्या ४२ जागांची नोकरभरती घेण्यासाठी अद्याप एजंसी ठरली नसल्याचे बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले. तूर्त या भरतीसाठी न्यायालयाला वेळ वाढवून मागितला जाणार आहे. मात्र, ही भरती घेण्यासाठी दिल्लीच्या ‘जेएसआर’ एक्झामिनेशन सर्व्हिसेस एलएलपी या कंपनीवर अधिक जोर असल्याचे सांगितले जाते.

आर्णीच्या ग्राहकांची एलसीबीकडून विचारपूस आर्णी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेतील कोट्यवधींचे अपहार प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणात रविवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आर्णी पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी आर्णी शाखेच्या ग्राहकांना पोलीस ठाण्यात बोलावून सविस्तर विचारपूस करण्यात आली. बँकेकडून देण्यात आलेल्या तक्रारीत ज्या २५ ग्राहकांची नावे आहेत त्यांना चाैकशीसाठी ठाण्यात बोलाविण्यात आले होते. ग्राहकांना सकाळी १० वाजता बोलावून एलसीबीचे पथकच उशिरा पोहोचले. १२ वाजता पथक आल्यानंतर सायंकाळी ५ वाजतापर्यंत ही चाैकशी सुरू होती.

 

टॅग्स :bankबँक