शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मिटणापूरची उर्दू शाळा कोसळण्याच्या मार्गावर

By admin | Updated: August 5, 2015 00:14 IST

शहरालगतच्या मिटणापूर येथील उर्दू शाळा धोकादायक स्थिती असून, या शाळेत साप, विंचू आदी सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार असतो.

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष : शाळेत सरपटणाऱ्या प्राण्यांचा संचारबाभूळगाव : शहरालगतच्या मिटणापूर येथील उर्दू शाळा धोकादायक स्थिती असून, या शाळेत साप, विंचू आदी सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे या शाळेची इमारत निर्लेखित करावी असा प्रस्ताव शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाकडे पाठविला. परंतु या प्रस्तावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. मिटणापूर येथे सातवीपर्यंत शाळा आहे. मुख्याध्यापकासह चार शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेच्या दोन खोल्या पडक्या असून, एक पिल्लर केव्हा कोसळेल याचा नेम नाही. अशा स्थिती बाभूळगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे शाळेच्या धोकादायक खोल्या पाडण्याचा प्रस्ताव दिला. परंतु उपयोग झाला नाही. सदर शाळेच्या छपरावरील टीनपत्रे २०१३ मध्ये वादळात उडून गेली होती. याबाबतही शिक्षण विभागाला कळविण्यात आले, परंतु अद्यापपर्यंत टीनपत्रे टाकण्यात आले नाही. त्यामुळे या धोकादायक खोलीत ज्ञानार्जन करावे लागते. पडक्या खोलीत भेगा पडल्या असून, साप, विंचू, सरडे, उंदीर आदी प्राणी निघणे नित्याची बाब झाली आहे. केंद्रप्र्रमुखाच्या भेटीतही हा प्रकार निदर्शनास आणून दिला, परंतु उपयोग होत नाही. अशा स्थिती विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)