शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

टिपेश्वर अभयारण्यातील पाणवठे दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:56 IST

ऑनलाईन लोकमतवणी : दोन तालुक्यात विखुरलेल्या व पर्यटकांना कायम खुणावणाºया टिपेश्वर अभयारण्यातील पाणवठ्याच्या देखभालीकडे अभयारण्य प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे. आठवड्यातून एकदा तरी या पाणवठ्याची स्वच्छता व्हावी, असे अपेक्षित असताना तसे घडताना दिसत नाही. परिणामी हे पाणवठे कचऱ्याने तुंबून असल्याचे निदर्शनास येते.टिपेश्वर अभयारण्यात १३ पेक्षा ...

ठळक मुद्देस्वच्छतेकडे दुर्लक्ष : वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात, पाण्यात पालापाचोळा

ऑनलाईन लोकमतवणी : दोन तालुक्यात विखुरलेल्या व पर्यटकांना कायम खुणावणाºया टिपेश्वर अभयारण्यातील पाणवठ्याच्या देखभालीकडे अभयारण्य प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे. आठवड्यातून एकदा तरी या पाणवठ्याची स्वच्छता व्हावी, असे अपेक्षित असताना तसे घडताना दिसत नाही. परिणामी हे पाणवठे कचऱ्याने तुंबून असल्याचे निदर्शनास येते.टिपेश्वर अभयारण्यात १३ पेक्षा अधिक वाघांचा वावर असल्याने या अभयारण्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र वन्यजीवांच्या सोईसुविधांकडे प्रशासनाचे लक्षच नसल्याचे दिसून येते. वन्यजीवांची तहान भागावी यासाठी या अभयारण्यात ६५ पेक्षा अधिक पाणवठे आहेत. त्यातील २२ ते २५ पाणवठे हे सौरऊर्जेवर चालतात. मात्र हे सर्वच पाणवठ्यांमध्ये कचरा साचलेला असतो. त्यामुळे पाणवठ्यातील पाणी दूषित होत चालले आहे. दर सोमवारी हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येते. निदान या दिवशी तरी पाणवठ्यांची देखभाल होणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पानगळती होते. झाडांचा पालापाचोळा या पाणवठ्यात पडतो. त्यामुळे पाणी दूषित होते. पाणवठ्याच्या अवतीभोवती सदाहरित झाडांची लागवड करणेही आवश्यक असते. मात्र अनेक पाणवठ्याच्या अवतीभोवती सागवानी झाडे आहेत. उन्हाळ्यात ही झाडे निष्पर्ण असतात. त्यामुळे पाणवठ्यातील पाणी उन्हामुळे तापते. त्याच गरम पाण्यावर वन्यजीवांना आपली तहान भागवावी लागते. यासंदर्भात टिपेश्वर अभयारण्याचे आरएफओ अमर सिडाम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.१४८ चौैरस स्केअर किलोमिटरवर पांढरकवडा व घाटंजी अशा दोन तालुक्यात विस्तारलेल्या या अभयारण्यात वाघांसह सर्वच वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे दर दिवशी या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी असते. राष्ट्रीय महामार्गापासून केवळ दिड किलोमिटर अंतरावर असलेला हे महाराष्ट्रातील एकमेव अभयारण्य आहे, हे विशेष.पाणवठे असुरक्षितटिपेश्वर अभयारण्यातील अनेक पाणवठे पर्यटकांच्या दृष्टीने असुरक्षित आहेत. के.सी.अर्थात कुडचीकुडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या पॉइंटवरील पाणवठ्याला कोणत्याही प्रकारचा दगडाचा बांध अथवा लाकडाचे कंपाऊंड नाही. त्यामुळे पर्यटकांची वाहने अगदी पाणवठ्यापर्यंत जातात. या पाणवठ्यावर अनेक वाघ पाणी पिण्यासाठी येतो. त्यामुळे पर्यटकांसाठी ते धोकादायक ठरू शकते.

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्य