शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शहराला दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:05 IST

शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. नळाचे निश्चित दिवस ठरले नसून अतिशय दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरात साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमहिलांचा मोर्चा धडकला : नगरसेवकांचे नेतृत्व, प्राधिकरणाला विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. नळाचे निश्चित दिवस ठरले नसून अतिशय दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरात साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराला जीवन प्राधिकरणाची यंत्रणा जबाबदार असून याचा जाब विचारण्यासाठी नगरसेवक व महिलांनी सोमवारी दुपारी जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली.शहरात मोठ्याप्रमाणात डेंग्यूची, टायफाईडची साथ सुरू आहे. यात आणखी भर घालण्याचे काम जीवन प्राधिकरण दूषित पाणीपुरवठ्यातून करत आहे. कधी नव्हे तो यवतमाळात कॉलराची लागण झाली. डायरियाचे रुग्ण आताही वाढत आहे. जीवन प्राधिकणर चक्क मानवी आरोग्याशी खेळण्याचे काम करत आहे. अनेक भागात आठ ते दहा दिवसानंतरही नळ येत नाही. पाणीपुरवठ्याचे निळोणा आणि चापडोह हे दोन्ही प्रकल्प तुडूंब भरलेले असताना नियमित नळ येत नाही. कधी तरी आलेल्या नळातून हातही लावता येणार नाही, असे पाणी येत आहे. ही समस्या शहरातील सर्वच भागात आहे.दूषित व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे संतापलेल्या बांगरनगर, गिरीनगर, विठ्ठलवाडी, छत्रपतीनगर, अभिनव कॉलनी, संदीप टॉकीज परिसर, साईनगर, कामगारनगर, वंजारी फैल, बुटले ले-आऊट आदी परिसरातील महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी परिसरातील नगरसेवक विशाल पावडे, उध्दवराव साबळे, कोमल कार्तिक ताजने, साधना काळे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन नियमित व शुध्द पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. आठ दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला.आरोग्याशी खेळखंडोबादूषित पाणीपुरवठा करून जीवन प्राधिकरण नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहे. पिण्यायोग्य तर सोडाच दैनंदिन वापरायोग्य पाणी नळातून येत नाही. उन्हाळ््यापासून कोलमडलेले पाणीपुरवठ्याचे नियोजन अजूनही सुरळीत झाले नाही. शहरात ठिकठिकाणी नळाची मुख्य पाईपलाईन लिक आहे. हजारो लिटर पाणी वाहून जात आहे.