शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे

By admin | Updated: March 23, 2017 00:26 IST

पैनगंगा नदीकाठावरील सर्व गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. नदीपात्रात त्वरित पाणी सोडावे या मागणीसाठी

नागरिक धडकले तहसीलवर : नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाई उमरखेड : पैनगंगा नदीकाठावरील सर्व गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. नदीपात्रात त्वरित पाणी सोडावे या मागणीसाठी बुधवारी या गावांमधील नागरिक तहसील कार्यालयावर धडकले. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगेच्या नदीपात्रात पुरेसे पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे नदीपात्रात पुरेसे पाणी सोडण्यात यावे ही नागरिकांची मागणी आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन तहसीलदारांना दिले. पैनगंगा नदीत इसापूर धरणातून पाणी सोडले आहे. परंतु ते पाणी अनेक गावांपर्यंत पोहोचलेच नाही. त्यामुळे ब्राह्मणगाव, बिटरगाव, सावळेश्वर, बोरी, चातारी, मानकेश्वर, सिंदगी, दिघी, पळसपूर, जेलारी, कवठा आदींसह अनेक गावात पाणी पोहोचलेच नाही. दहा दलघमी पाणी सध्या चालू आहे. ते पाणी पैनगंगा नदीपात्रातून शेवटपर्यंत जात नाही. त्यामुळे पाणी अधिक प्रमाणात सोडण्याची गरज आहे. दहा दलघमी पाणी अतिरिक्त सोडण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. दरवर्षी विदर्भ-मराठवाड्यातील पैनगंगा नदीकाठावरील असंख्य गावांमध्ये उन्हाळ््याच्या दिवसांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवते. यावर्षी पावसाळ््यात चांगला पाऊस होऊनही पाणीटंचाईची परिस्थिती कायम आहे. त्यामुळे शेताला तर सोडाच पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होताना दिसत नाही. जनावरे कशी जगवावी हाही प्रश्न नागरिकांच्यासमोर आहे. इसापूर धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी अत्यल्प आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही त्याचा कोणताही लाभ न झाल्याने अखेरीस शेतकऱ्यांनी उमरखेड तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदार भगवान कांबळे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अ‍ॅड़ शिवाजीराव वानखेडे, धनंजय माने, वामन वानखेडे, रणजीत वानखेडे, सुदर्शन रावते, अनसाजी पतंगे, दादाराव वानखेडे, संदीप देवसरकर, पांडुरंग माने, शेख रहीम, परमेश्वर माने, गणपत रावते, बापूराव वानखेडे, सुनील वानखेडे, संतोष माने आदींसह विदर्भ-मराठवाड्यातील अनेक गावातील नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)