यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहे. पहिल्याच टप्प्यात या कामांमधून जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. अभियानाच्या या यशोगाथेवर जिल्हा माहिती कार्यालयाने पुस्तिका तयार केला असून या पुस्तिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, जिल्ह्यातील सर्व आमदार, माहिती संचालक मोहन राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, सीईओ डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, कृषीचे सहसंचालक एस.आर.सरदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
जलयुक्तची यशोगाथा पुस्तकाच्या स्वरूपात
By admin | Updated: December 12, 2015 05:20 IST