शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पाणपोईचा धर्म झाला आता बाटली‘बंद’

By admin | Updated: March 22, 2017 00:09 IST

तहानलेल्यांची तृष्णाशांती करण्याएवढा धर्म नाही. म्हणूनच उन्हाळा आला की, ठिकठिकाणी पाणपोई लावली जाते. पुसद शहरही त्याला अपवाद नाही.

विकतचे पाणी : सामाजिक संघटनांच्या पुढाकाराची गरज पुसद : तहानलेल्यांची तृष्णाशांती करण्याएवढा धर्म नाही. म्हणूनच उन्हाळा आला की, ठिकठिकाणी पाणपोई लावली जाते. पुसद शहरही त्याला अपवाद नाही. दरवर्षी सामाजिक संघटना आणि दानशूर मंडळी पाणपोई सुरू करतात. परंतु अलिकडे पाण्याचा व्यापार सुरू झाला आणि पाणपोईचा धर्म बाटली‘बंद’ झाला. अंगाची काहिली करणाऱ्या उन्हात प्रत्येकाला पाण्याची गरज भासते. पुसद शहरात बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांना पाण्याची ही गरज अधिक असते. त्यामुळे उन्हाळ््याच्या दिवसात शहरात ठिकठिकाणी पानपोई लावल्या जात होत्या. कुठे रांजन तर कुठे कायमस्वरुपी पानपोया उभारल्या आहेत. यासाठी शहरातील सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्ती पुढाकारही घेतात. दरवर्षी बसस्थानकासमोर, शिवाजी चौक, सुभाष चौक, मेन लाईन, श्रीरामपूर परिसरात पाणपोई लावली जाते. यावर ग्रामीण भागातून आलेले नागरिक आपली तहान भागवितात परंतु यंदा उन्हळ््याची चाहुल लागली तरी अपवाद वगळता कुठेही पाणपोई दिसत नाही. सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या बसस्थानकावर तीन पाणपोई आहेत. त्यातील कामगार संघटनेची पाणपोई कायमची बंद आहे. बसस्थानकाच्या प्लॅटफार्मजवळ असलेल्या पाणपोईचाही उपयोग नागरिक घेत नाहीत. तर तिसऱ्या पाणपोईची योग्य देखभाल दिसत नाही. शिवाजी चौक आणि मेन लाईनमध्येही अद्यापपर्यंत पाणपोई सुरू झालेली नाही. तसेच शहराच्या इतर भागातही कुठे अपवाद वगळता पाणपोई नाही. परिणामी नागरिकांना विकतचे पाणी प्यावे लागत आहे. अलिकडे पाण्याचा व्यापार जोरात सुरू आहे. पाऊच आणि बाटलीबंद पाणी सहज उपलब्ध होते. दोन रुपयांच्या पाऊचपासून वीस रुपयांच्या बॉटलपर्यंत पाणी विकत घ्यावे लागते. परंतु ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची विकतचे पाणी घेण्याची मानसिकता नसते. त्यामुळे ही मंडळी शहरातील हॉटेल, टपरीचा आधार घेतात. परंतु त्या ठिकाणीही काही विकत घेतल्याशिवाय पाणीच मिळत नाही. अनेकदा दुकानदाराकडेच पाण्याची मागणी करावी लागते. यामुळे भर उन्हात व्याकुळ झालेले नागरिक पाण्याच्या एका घोटासाठी भटकंती करताना दिसतात. (कार्यालय चमू)