शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कप स्पर्धा लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 21:57 IST

सध्या जिल्ह्यात पाणी समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे यावर्षी राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी येथे आयोजित आढावा सभेत केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : राळेगाव येथे घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : सध्या जिल्ह्यात पाणी समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे यावर्षी राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी येथे आयोजित आढावा सभेत केले.येथील वसंत जिनिंग सभागृहात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची तालुकास्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. डॉ.राजेश देशमुख म्हणाले, हमखास ९०० मिमी पाऊस पडणाºया आपल्या जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली. भविष्यातील मोठ्या संकटाची ही चाहूल आहे. यामुळे आपण वेळीच सावध होवून जलयुक्त शिवार शेततळे, शोषखड्डे, विहीर पुनर्भरण आदींच्या माध्यमातून आणि वॉटर कप स्पर्धेच्या साहाय्याने गाव पाणीदार करावे, असे आवाहन डॉ.देशमुख यांनी केले.या बैठकीला पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक डॉ.अविनाश पौळ, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, उषा भोयर आदी उपस्थित होते. डॉ.अविनाश पौळ यांनी वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करणे खूप खडतर असल्याचे सांगितले. मात्र स्पर्धेत सहभागी गावातील नागरिकांनी कुणाचीही वाट न बघता श्रमदान करण्याचे आवाहन केले. यावेळी गेल्यावर्षी वॉटर कप स्पर्धेत उत्कृष्ट कार्य करणाºया कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला. काही नागरिकांनी गावातील समस्या कथन केल्या. डॉ.पौळ यांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. संचालन संतोष शिरसाट तर आभार संगीता वासाडे यांनी मानले. बैठकीला स्पर्धेतील गावांचे प्रतिनिधी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक उपस्थित होते.