शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात साकारणार देखणे वनउद्यान

By admin | Updated: August 3, 2016 01:28 IST

जैव वैविधता आणि प्राचीन संस्कृतीने नटलेल्या निसर्गसंपन्न यवतमाळच्या वैभवात देखण्या वनउद्यानाने भर पडणार आहे.

निसर्ग पर्यटनाची संधी : जांब रोडवर ३५ हेक्टरवर निसर्ग आणि पर्यटनाचा सुंदर मेळ सुरेंद्र राऊत यवतमाळ जैव वैविधता आणि प्राचीन संस्कृतीने नटलेल्या निसर्गसंपन्न यवतमाळच्या वैभवात देखण्या वनउद्यानाने भर पडणार आहे. येथील जांब रोडवरील वनविभागाच्या ३५ हेक्टर क्षेत्रात लवकरच वनउद्यान साकारले जाणार असून, वनसंपदा, निसर्ग आणि पर्यटन याचा येथे सुंदर मेळ घातला जाणार आहे. यवतमाळ जिल्हा हा वनश्रीने नटलेला आहे. परंतु यवतमाळ शहरात मात्र नागरिकांसाठी विरंगुळ््याचे कोणतेही ठिकाण नाही. नैसर्गिकदृष्ट्या पर्यटनस्थळाची स्थिती असलेल्या यवतमाळच्या सौंदर्यात या वनउद्यानाने भर घातली जाणार आहे. यवतमाळ शहरापासून अगदी जवळ जांब रोडवर हे वनउद्यान साकारले जात आहे. शासनाने २०१५-१६ मध्ये वनक्षेत्र पर्यटनस्थळ विकासांतर्गत वनजमिनीचा सर्वांगिण विकास करण्याचे ठरविले आहे. त्यानुसारच निसर्ग पर्यटनस्थळ विकसित केले जाणार आहे. येथे पर्यावरण पूरक व्यवस्था, वन व वन्यप्राणी विषयक सामुग्री, दृकश्राव्य सामुग्री, निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासोबतच पाच किलोमीटरचा वॉकिंगट्रॅक हे या वनउद्यानाचे खास वैशिष्ट्य राहणार आहे. या वनउद्यानाच्या चारही बाजुला चार किलोमीटर लांबीची संरक्षक भिंत आणि दोन प्रवेशव्दार उभारले जाणार आहे. वनउद्यानातून वाहणाऱ्या नाल्याचा वापर वनउद्यानाचे सौंदर्य वाढविण्यासाठी केला जाणार आहे. या वनउद्यानात लहान मुलांच्या खेळाण्यासाठी आणि निसर्गअभ्यासासाठी विशेष सुविधा उपलब्ध केल्या जातील. उद्यानात कमळ तलाव आणि इतर प्रजातींच्या वेली टाकून तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. याठिकाणी पक्षीथांबा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच लगतच पक्षीनिरीक्षण कुटी आणि विश्रामगृहही राहणार आहे. प्रस्तावित वनउद्यानात उद्यानासाठी तज्ज्ञ आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यक्तिंकडून पाहणी करण्यात आली. मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, मुख्य वनअभियंता भगत यांनी पाहणी करून वनउद्यान निर्मितीचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी यांनी विशेष पुढाकार घेतला. सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करून हे वनउद्यान शहराच्या दृष्टिकोणातून किती महत्वाचे आहे, हे शासनाला पटवून दिले. या उद्यानात वनौषधी वृक्ष, सदाहरित वृक्ष, रानफळांची वृक्ष आणि रस्त्याच्या दुतर्फा शोभिवंत झाडे लावली जाणार आहे.