शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेचे गुप्त पथक ठेवणार प्लास्टिकवर वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 22:21 IST

शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी यवतमाळ नगरपरिषद प्रशासन सरसावले असून यासाठी शहरात गुप्त पथक तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे आजपासून वापरावर बंदी : खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी यवतमाळ नगरपरिषद प्रशासन सरसावले असून यासाठी शहरात गुप्त पथक तयार करण्यात आले आहे. तसेच प्लास्टिक खरेदी विक्री करणाऱ्यांवरही धाडी टाकल्या जाणार आहे. प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगरपरिषदेकडून नियोजन सुरू आहे.प्लास्टिक पिशव्यांमुळे शहर स्वच्छतेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मानव व पर्यावरणास प्लास्टिक अतिशय घातक ठरत आहे. जागतिक स्तरावर प्लास्टिकविरोधात आवाज उठविला जात आहे. कधीच विघटीत न होणाºया प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. नगरपरिषद क्षेत्रात प्लास्टिकचा वारेमाप वापर होत असल्याने गटारी तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्लास्टिक जनावरांच्या खाण्यात गेल्यामुळे त्यांनाही असाध्य आजार जडत आहे.२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या सर्रास वापरल्या जातात. पर्यावरणप्रेमी व सामाजिक संघटनांनी सातत्याने प्लास्टिकपासून उदभवणारे आजार आणि पर्यावरणाची होणारी हानी याबाबत जाणीवजागृती सुरू आहे. मात्र त्यानंतरही दैनंदिन वापरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा समावेश आहे. आता यावर दंडात्मक कारवाई करून निर्बंध घालण्याचे कठोर पाऊल शासनस्तरावरून उचलण्यात आले आहे. याला स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत समाविष्ट केले आहे. प्लास्टिक निर्मूलनाची जबाबदारीही नगरपरिषदांवर आली आहे. पालिका प्रशासनाने या मोहिमेला प्रभावी करण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहे. शहर स्वच्छतेसोबतच प्लास्टिकपासून परावृत्त करण्याची मोहीम आता शहरात राबविली जाणार आहे. अर्थात या मोहिमेला नागरिकांनी स्वत:हून प्रतिसाद दिल्यास ही मोहीम यशस्वी करता येईल. कारवाईचा धाक हा एका मर्यादेपर्यंत ठिक आहे. मात्र वैयक्तिक प्रत्येकाने प्लास्टिक बॅग वापरणार किंवा वस्तू खरेदी करणार नाही असा संकल्प केल्यास या निर्णयाचे खºया अर्थाने फलित होणार आहे.मानवी आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने टाळावे हा उद्देश ठेवून नगरपरिषद आरोग्य विभाग कामाला लागला आहे. गुप्त पथक शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन त्या ठिकाणी प्लास्टिकचा वापर करताना कुणी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या पथकात नगरपरिषदेतील आरोग्य निरीक्षक यासह विविध अधिकारी-कर्मचारी राहणार आहे. यात प्लास्टिकचा वापर होत असताना आढळले तर कठोर कारवाई होणार आहे. नागरिकांना यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.जिल्हाभर प्रभावी अंमलबजावणीशहरी भागासह ग्रामीण भागातही प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम नागरिकांना समजावून सांगितले जाणार आहे. तसेच व्यावसायिक आणि किरकोळ विक्रेत्यांनाही प्लास्टिक वापराबाबत यापूर्वीही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना घराबाहेर निघताना कापडी पिशवी सोबत घेऊन जाण्याबाबत सूचना दिली जाणार आहे. जिल्ह्यात सर्वत्र प्लास्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करून पर्यावरण रक्षण केले जाणार आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीYavatmalयवतमाळ