शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
4
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
5
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
6
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
7
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
8
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
9
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
10
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
11
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
12
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
13
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
14
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
15
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
16
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
17
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
18
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
19
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
20
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 

परतीच्या पावसाचा कहर

By admin | Updated: September 25, 2016 02:51 IST

तब्बल दीड महिना दडून बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात आगमन झाले असून हा पाऊस मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.

तिसऱ्या दिवशी पाऊस : सोयाबीनला कोंब, मूग व उडीदाला फटकायवतमाळ : तब्बल दीड महिना दडून बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात आगमन झाले असून हा पाऊस मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. गत तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा सोयाबीन, उडीद, मूग पिकांना फटका बसत आहे. काही ठिकाणी तर सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटल्याचे दिसत आहे. शनिवारी दुपारी यवतमाळ शहरासह जिल्ह्यात धुव्वाधार पावसाने हजेरी लावली.खरीप हंगामाच्या सुरुवातीला दमदार पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र तब्बल दीड महिना पावसाने दडी मारली. अनेक शेतकऱ्यांनी ओलिताची सोय करून पिकांना कसेबसे जगविले. सोयाबीन, उडीद, मूग काढणीवर आला आणि नेमका याचवेळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. गत आठवडाभरापासून यवतमाळ जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धडाका सुरू आहे. तीन दिवसांपासून सर्वत्र पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शेतातील वाळलेला सोयाबीन भिजत आहे. काही ठिकाणी सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहे. काढलेला मूग आणि उडीद झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास यवतमाळ शहरात धुव्वाधार पाऊस बरसला. पावसाचा जोर एवढा होता की पाच फुटावरीलही दिसत नव्हते. तसेच जिल्ह्यातील इतरही भागातही जोरदार पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस महागाव आणि उमरखेडमध्ये कोसळला. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९३ टक्के पाऊस कोसळला आहे. परतीच्या पावसाने शेतकरी चिंतेत सापडला असून आणखी काही दिवस पाऊस बरसण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (शहर वार्ताहर)अंतरगाव येथे वीज कोसळून मजूर ठारबाभूळगाव : तालुक्यातील अंतरगाव येथे वीज कोसळून मजूर ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. किसन गंगाराम वाटबुरे (६६) असे मृताचे नाव आहे. तो गावातील मधुकर राऊत यांच्या शेतात सोयाबीनमध्ये काम करीत होता. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मेघगर्जना होऊन वीज या शेतात कोसळली. त्यात किसन जागीच ठार झाला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. (प्रतिनिधी)