शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात प्रतिबंधित अवैध गुटख्याची डझनावर गोदामे

By admin | Updated: June 28, 2017 00:28 IST

पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या मेहेरबानीवर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याचा राजरोसपणे सर्वदूर व्यापार सुरू आहे.

पोलीस-एफडीए मेहेरबान : कारंजा, अमरावतीवरून थेट पुरवठा लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या मेहेरबानीवर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याचा राजरोसपणे सर्वदूर व्यापार सुरू आहे. गुटख्याची ठिकठिकाणी गोदामे असून त्यांना ‘वसुली’ करणाऱ्या पोलिसांचे सुरक्षा कवच लाभले आहे. जिल्ह्यात कारंजा व अमरावती येथून खास गुटख्याचा पुरवठा केला जातो. ‘मिलीभगत’ असल्याने कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याची कारंजा व अमरावतीवरून निघणारी ही वाहने अडविली जात नाही. जणू पोलीस संरक्षणात या वाहनांचा वणीपासून उमरखेडपर्यंतचा प्रवास सुखरुप पार पडतो. शनिमंदिर चौक, लोखंडी पूल, गांधी चौक ते गुजरी मार्ग अशा काही ठिकाणी प्रतिबंधित गुटख्याची मोठी गोदामे आहेत. याशिवाय लहान साठवणूक केंद्रांची संख्याही बरीच मोठी आहे. कारंजाहून येणारा गुटखा दारव्हा, आर्णी, अकोलाबाजार, घाटंजी अशा वेगवेगळ्या भागातील सुमारे १५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोहोचविला जातो. आर्णीमध्येही गुटख्याचे प्रमुख दोन माफिये आहेत. अमरावतीवरून येणारा गुटखा उर्वरित काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोहोचतो. कारंजा व अमरावतीच्या माफियांनी जिल्ह्यातील आपली गावे वाटू घेतली आहेत. वणीतही दोन प्रमुख माफिया आहेत. असेच माफिया सर्वच उपविभागात ठाण मांडून आहेत. अमरावतीच्या गुटखा माफियाला ‘गावचा माणूस’ म्हणून पोलीस दलातून खुले अभय दिले जात आहे. ‘वसुली’साठी पोलिसांची खास यंत्रणा एकट्या यवतमाळ जिल्ह्याचा विचार केल्यास येथे प्रतिबंधित गुटख्यातून लाखोंची उलाढाल होते. या उलाढालीचा काही सेंटरमधून ‘सुगंध’ येतो. आर्णीत पावणे दोन कोटींच्या गुटखा धाडीने यापूर्वीच गोदामांची ही बाब सिद्ध झाली आहे. या गुटख्याची ‘वसुली’ आणि त्यातून संरक्षण पुरविण्यासाठी पोलिसांची खास यंत्रणा कार्यरत असल्याचेही बोलले जाते. जिल्ह्यात गुटखा, मटका-जुगार, दारू, अवैध प्रवासी वाहतूक अशा वेगवेगळ्या हेडवरील ‘वसुली’साठी जिल्हा मुख्यालयी पोलिसांची वेगवेगळी पथके ‘सेवा’ देतात. खास ‘वसुली’साठीच काहींची नेमणूक असून त्यांची शासकीय सेवेतील संपूर्ण एनर्जी या एकाच कामावर खर्ची होते.