शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वणी-घुग्गुस चौपदरी सिमेंट रस्त्याला अल्पावधीतच तडे

By admin | Updated: January 5, 2016 02:56 IST

करंजी-घुग्गुस या राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुरू आहे. मात्र आत्तापर्यंत झालेले कामही

वणी : करंजी-घुग्गुस या राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुरू आहे. मात्र आत्तापर्यंत झालेले कामही दर्जेदार झाले नाही. या मार्गावर अनेक तडे गेले आहे. त्यामुळे रस्ता तयार करणाऱ्या कंपनीकडून आता ठिकठिकाणी मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे.करंजी ते घुग्गुस या राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. त्यामुळे या मार्गाचा विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. करंजी ते परसोडा फाट्यापर्यंत तीन पदरी डांबरीकरण व परसोडा फाटा ते घुग्गुसपर्यंत चार पदरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता व घुग्गुस ते पडोली फाटा चार पदरी डांबरी बनविण्याचे काम गेल्या सहा वर्षापूर्वी एका कंपनीला देण्यात आले. डिसेंबर २०१२ पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र अजूनही या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले नाही. रूंदीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली हजारो मौल्यवान झाडे तोडण्यात आली. मात्र या झाडांऐवजी दुसरी झाडे लावण्याचे औदार्य रस्ता बांधकाम कंपनीने दाखविले नाही. त्यामुळे संपूर्ण रस्ता बोडखा दिसत आहे. रस्त्याचे बांधकाम धीम्या गतीने होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता उंच केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून शेतमालाचे नुकसान होत आहे. साचलेले पाणी बाहेर काढण्याची व्यवस्थाही रस्ता कंपनीने केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर नवीनच संकट ओढवले आहे. कित्येक गावात जाणारे, शेतात जाणारे रस्ते मोडल्यामुळे वाहने, बैलगाड्या कोठून न्याव्या, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्त्यालगतच्या गावासाठी अ‍ॅप्रोच मार्ग करून देण्याची तरतूद असूनही कंपनीचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. वणी ते घुग्गुस दरम्यान सिमेंट काँक्रीट रस्ता बनविला. मात्र या रस्त्याला आत्ताच जागोजागी तडे गेले आहे. त्यामुळे हा रस्ता पुढे वाहतुकीला साथ देईल काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या रासायनिक पदार्थाने रस्त्यावरील फटी बुजविण्याचे काम सुरू आहे. ही मलमपट्टी कायमस्वरूपी टिकेल काय?, हासुद्धा प्रश्नच आहे. काही ठिकाणी रस्त्याची पातळी बिघडल्याने धावती वाहने उसळतात. त्यामुळे कंपनी रस्ता बनविताना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली बनवित आहे की नाही, असाही प्रश्न पडतो. बांधकाम विभागाचेही रस्त्याच्या दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पथकर नाक्यांची उभारणी सुरू४रस्त्याचे बरेच बांधकाम अद्याप शिल्लक आहे. मात्र कंपनीने रस्त्यावरील पथकर वसूल करण्यासाठी पथकर नाक्यांची उभारणी सुरू केली आहे. करंजी व वणीच्या रेल्वे क्रॉसिंगजवळ पथकर नाके उभारले गेले आहे. कंपनीने रस्ता वाहतुकीस ठणठणीत तयार करावा, त्यानंतरच पथकर सुरू करावा, अशी वाहनधारकांची अपेक्षा आहे.