शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वणीत क्रिकेट सट्टा तेजीत

By admin | Updated: May 22, 2016 02:18 IST

वणी शहरात आयपीएल क्रिकेट सट्टा तेजीत सुरू आहे. हा सट्टा ‘मोबाईल टू मोबाईल’ सुरू असल्याने पोलिसांनाही सट्टेबाजांचा शोध लागणे कठीण झाले आहे.

सट्टेबाजांचा शोध लागेना : ‘मोबाईल टू मोबाईल’ सेवावणी : वणी शहरात आयपीएल क्रिकेट सट्टा तेजीत सुरू आहे. हा सट्टा ‘मोबाईल टू मोबाईल’ सुरू असल्याने पोलिसांनाही सट्टेबाजांचा शोध लागणे कठीण झाले आहे.शहरात मोठ्या प्रमाणात आयपीएल सट्टा सुरू असल्याची माहिती आहे. आत्तापर्यंत गेल्या दोन महिन्यात एकूण ५२ सामने झाले आाहे. गेल्या ११ एप्रिलपासून स्पर्धा सुरू झाली. आता केवळ पाच सामने बाकी आहे. २७ मे रोजी फायनल होणार आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात मोबाईलद्वारे सट्टा लावला जात आहे. मोबाईलवर मॅसेज पाठवून संबंधित चमूचा रेट ठरल्याचे ग्राहकांना सांगण्यात येते. त्यानुसार ग्राहक दररोज ९० हजार ते एक कोटीपर्यंत सट्टा लावत असल्याची चर्चा जोरात आहे. यात उच्चभू्र घरातील युवक व काही प्रतिष्ठीत अडकले आहेत. शहरात एका मुख्य ठिकाणी बसून हे सट्ट्याचे सूत्र हालविण्यात येत आहे. सामना सुरू असतो, त्यावेळी संबंधित ‘बुकी’ आपल्या दूरचित्रवाणी संचासमोर मोबाईलवर ग्राहकांच्या संपर्कात असतो. तो त्यावेळी बाहेर निघत नाही व कुणाच्या संपर्कातसुद्धा येत नाही. मात्र एजंटमार्फत तो सतत ग्राहकांच्या संपर्कात राहतो. वणी शहरात मोठ्या प्रमाणात पैसा असल्याचा सर्वांचा समज आहे. त्यामुळे वरोरा-चंद्रपूरचे एजंटही ग्राहकांच्या शोधात वणीत ठाण मांडून बसले आहे. बाहेर जिल्ह्यातील हे एजंट मोबाईलद्वारे सतत ग्राहकांच्या संपर्कात राहतात. व्हॉट्स अ‍ॅपवर मॅसेज पाठवून रेटची माहिती देतात. काही दिवसांपूर्वी बेंगलोर ८६ ते ८९, मुंबई भारी १८२ ते १८५, बेंगलोर भारी १८५ ते १८८, हैद्राबाद २.५५, गुजराथ ३९, कलकत्ता ४.२० पैसे रेटप्रमाणे दर होता, असे सांगितले जाते. दररोज ज्या संघाचा खेळ असतो, त्या संघाचे रेट मोबाईलद्वारे ग्राहकांना सांगण्यात येतात. आत्तापर्यंत या अवैध सट्ट्यात पडून अनेक मोठ्या कुटुंबातील मंडळी कंगाल झाली आहे. सतत तोटा येत असल्याने काहींनी अखेर नावडत्या युवतींसोबत विवाह उरकून नागपूर गाठले आहे. गेल्यावर्षी शहरातील एका व्यक्तीच्या घरावर सट्ट्यातील पैशाच्या वादातूनच हल्ला झाल्याची चर्चा आहे. आत्तापर्यंत काहींनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला आहे. हा सर्व प्रकार आयपीएलमुळे होत असल्याची माहिती समोर येत आहे. हा सर्व सट्टा मोबाईल टू मोबाईल चालतो. त्यामुळे कोण, किती, या खेळामध्ये डुबला किंवा तरला, हे कुणालाच माहिती पडत नाही. केवळ बुकी आणि सट्टा घेणाऱ्यांनाच त्याची माहिती असते. मात्र कालांतराने सामान्य नागरिकांनाही वस्तुस्थिती नजरेस येते. मोबाईलमुळे या सट्ट्याचे हातपाय बाहेर दिसत नसून त्यामुळे पोलिसही चक्रावून शांत बसून आहे. पोलिसांचे अवैध दारूकडे मात्र बरोबर लक्ष आहे. अवैध दारूमुळे कदाचित डी.बी. पथकालाही आयपीएल सट्ट्याच्या ठिकाणाचा शोध लागत नसावा, अशी चर्चा आहे. (प्रतिनिधी)$$्रिपोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क कोलमडलेपोलिसांचे खबरेसुद्धा वणीतील आयपीएल सट्ट्याची माहिती पोलिसांना देण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच गेल्या महिन्यापासून या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची चर्चा सुरू आहे. आयपीएलमध्ये आत्तापर्यंत जवळपास ५२ सामने झाले आहेत. मात्र एकदाही कारवाई झालेली नाही. डी.बी पथकासोबतच यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही अपयशी ठरत आहे. त्यांचेही वणीकडे लक्ष नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी या पथकाने वणीत आयपीएल दरम्यान हमखास धाड पडणार असल्याचे सुतोवाच केले होते. मात्र त्यांचा तो दावादेखील आता फोल ठरत आहे.