शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आता बोलतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंती

By admin | Updated: February 4, 2016 02:33 IST

जिल्हयातील शेतकऱ्यांचे मनोबल व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

चित्रकारांसाठी खुली स्पर्धा : चेतना अभियानात चित्ररुपाने जनजागृती, शेतकऱ्यांना प्रेरणादायी चित्रांचा समावेशयवतमाळ : जिल्हयातील शेतकऱ्यांचे मनोबल व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल असे चित्र, पेंटीग्स काढण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभरातील चित्रकार, शाळा, महाविदयालयीतील विदयाथ्यांनी स्वयंत्स्फूर्तीने अशी चित्र रेखाटावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय हे प्रशासनाचे मुख्य कार्यालय असल्याने येथे नागरिकांची सतत वर्दळ असते. बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहेच, परंतु हेच जर परिणामकारक अशा चित्रांमधून दाखविल्यास शेतकऱ्यांना त्यापासून निश्चितच प्रेरणा मिळेल. हा यामागील उददेश आहे. यामध्ये प्रगतशील शेतकरी, शेत नांगरणारा शेतकरी, टॅ्रक्टर चालविणारा शेतकरी, सिंचनाखालील शेत, कृषी पंपाने ओलीत करणारा शेतकरी, वडील शेतात काम तर त्यांचा मुलगा अधिकारी पदावर काम करीत असतांना असे आपल्याच कल्पनेतील नानाविध विषय चित्रकारांना रेखाटायची आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील दर्शनी भागातील भिंती चित्रकारांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी चित्रकार, शालेय व महाविदयालयीन विदयार्थी यांनी आपल्या नावाची नोंद बळीराजा चेतना कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे करावी. यासाठी प्रथम पारीतोषीक दहा हजार रुपये, द्वितीय पाच हजार तर तृतीय क्रमांकाला तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हाभरातील जास्तीत जास्त चित्रकार व विदयार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. (प्रतिनिधी)