शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कळंब-राळेगाव मार्गावर चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 21:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कळंब : कळंब-राळेगाव-वडकी सिमेंट रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. परंतु अजूनही शेतकऱ्यांचे रस्ते मोकळे करण्यात आले नाही. ...

ठळक मुद्देउमरीजवळ वाहतूक ठप्प : विकास आघाडीचा पुढाकार, रस्त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : कळंब-राळेगाव-वडकी सिमेंट रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. परंतु अजूनही शेतकऱ्यांचे रस्ते मोकळे करण्यात आले नाही. प्रवासी निवारे चुकीचे बसविण्यात आले या व इतर प्रश्नांसाठी कळंब तालुका विकास आघाडीच्यावतीने उमरी गावाजवळ सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.प्रवासी निवाऱ्यात पाणी आणि उन्हापासूनही संरक्षण होेत नाही. त्यातल्या त्यात केवळ चार लोकांना बसण्याची व्यवस्था केली. शेतातील रस्ते अजूनही सुरळीत करण्यात आले नाही. आमला, उमरी, कात्री आदी रस्त्यावर हायमास्ट लाईट लावण्याचे मान्य करुनही लावण्यात आले नाही. त्यामुळे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही तास बंद होती. आमदार डॉ.अशोक उईके, तहसीलदार सुनील पाटील, ठाणेदार नरेश रणधीर तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संबंधित रस्ता बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपली बाजू मांडली.या मोर्चाचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख यांनी केले. आंदोलनात मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबू पाटील वानखडे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे, बाजार समितीचे संचालक आनंदराव जगताप, पंचायत समिती सदस्य स्वाती दरणे, माजी पंचायत समिती सभापती शशिकांत देशमुख, पणन महामंडळाचे संचालक सुरेश चिंचोळकर, माटेगावचे सरपंच किशोर जगताप, कात्रीचे सरपंच पुरुषोत्तम आगलावे, उमरीचे सरपंच जनार्धन रोकडे, खुशाल रोकडे, बंडू येंगडे, प्रवीण दिघडे, तिलोत्तमा मडावी आदी सहभागी झाले होते.