शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचतगटाचे कर्ज माफ करा

By admin | Updated: June 29, 2017 00:12 IST

मायक्रो फायनान्स कंपनीकडून वितरित करण्यात आलेले कर्ज पठाणी पद्धतीने वसूल करण्यात येत आहे.

राज्य शासनाचा निषेध : ‘आप’च्या नेतृत्वात तहसीलवर धडक लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मायक्रो फायनान्स कंपनीकडून वितरित करण्यात आलेले कर्ज पठाणी पद्धतीने वसूल करण्यात येत आहे. या कंपन्यांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि महिला बचतगटाचे कर्ज माफ करण्यात यावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात महिलांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. मायक्रो फायनान्सचे वसुली अधिकारी कर्जाची वसुली करताना शिवीगाळ करतात. रात्री अपरात्री वसुलीसाठी घरापर्यंत धडकतात. महिला बचतगटाकडून पुरूष अधिकारी कर्ज वसुली करीत आहेत. राज्य शासनाने या संदर्भात फायनांन्स कंपन्याचे कर्ज वसुलीबाबत विभागीय आयुक्ताच्या नेतृत्वात समिती गठीत करण्यात आली. अद्यापही त्याचा अहवाल आला नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करण्यात यावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू करण्यात याव्या, घरकूल योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला. या गैरव्यव्हाराची चौकशी करण्यात यावी, अर्धवट राहिलेले घरकुल पूर्ण करण्यात यावा. राज्यात तातडीने दारूबंदी करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार सचिन शेजाळ यांना देण्यात आले. आम आदमी पार्टीेचे संयोजक वसंत ढोक यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी सुनंदा सावरकर, किशोर सावरकर, विलास वाडे, गुणवंत इंदूरकर, पुष्पा पोहनकर, संजय ढोले, मनिष माहूरकर, वकील शेख, अमरोज शेख, मनोहरराव विरूळकर, अजय शर्मा सहभागी झाले होते.