शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

घोडेबाजारात मतदारांना ‘आकड्यां’ची प्रतीक्षा

By admin | Updated: November 8, 2016 01:57 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. रिंगणात ‘सक्षम’ तीन

विधान परिषद : मतांचा गठ्ठा बाळगणाऱ्यांची संख्या वाढली सुरेंद्र राऊत ल्ल यवतमाळ विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. रिंगणात ‘सक्षम’ तीन उमेदवार असल्याने घोडेबाजाराचा ‘आकडा’ कधी उघडतो, याची प्रतीक्षा लागली आहे. प्रचाराचा धुराळा उडत असला तरी केवळ ‘सर्व फॉर्म्युलिटी’ पूर्ण केली जातील, इतकाच शब्द देऊन उमेदवार ‘आशिर्वादा’ची अपेक्षा करत आहेत. त्यामुळे मतांचा गठ्ठा बाळगणाऱ्यांची दिवसागणिक संख्या वाढत आहेत. यवतमाळ विधान परिषद मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच तुल्यबळ लढत होत आहे. काँग्र्रेस, शिवसेना-भाजपा युती व अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. हे उमेदवार सर्वच बाबतीत ‘दमखम’ आजमावणारे आहेत. अशा प्रकारची लढत येथे पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे निवडणूक ‘कॅश’ करण्यासाठी मतदारांनी व्यूहरचना आखली आहे. प्रत्येकाने कोणा-कोणाला भेटायचे, याची तयारी केली आहे. केवळ याच मुद्द्यावर एका संघटनेनेही आकार घेतला आहे. उमेदवारांची अडचण ओळखून चिल्लरचा बाजार करण्यापेक्षा आमच्याकडे ठोकचा ‘गठ्ठा’ असल्याचे जाहीरपणे सांगितले जात आहे. यातही कोणी कोणत्या पक्षाशी बोलायचे हे ठरविण्यात आले आहे. शेवटी राजकारणातील बडे मासे छोट्या माश्यांच्या तावडीत सापडले आहेत. यात आजी-माजी लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. सर्वच जण पक्षश्रेष्ठींपुढे आपली पत कायम ठेवण्यासाठी विधान परिषद उमेदवारांकरिता मतांची आकडेमोड करीत आहेत. शिवसेना नेत्यांवर सर्वाधिक दबाव सर्वाधिक दबाव हा शिवसेना नेत्यांवर आहे. थेट ‘मातोश्री’वरून उमेदवार आल्याने त्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळेच लढतीतील एका उमेदवारासमोर या नेत्यांनीे ‘तहा’चा प्रस्ताव ठेवला. मात्र ‘गॉडफादर’ने बारामतीतून झाडाझडती घेतल्याने ऐनवेळी हा प्रस्ताव बारगळला. ही वार्तासुद्धा जाणीवपूर्वक पसरविण्यात आली. विधान परिषद निवडणुकीच्या घडामोडीकडे पंचेंद्रीये लावून बसलेल्या मतदारांनी त्यातील तथ्य किती, याची लगेच पडताळणी केली. नगरपरिषद, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचाय समिती सभापतींकडून प्रत्येक बारिकसारिक हालचाली टिपण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाभरातील जुन्या संबंधांना उजाळा दिला जात आहे. संधीचे ‘सोने’ सर्व मिळूनच करायचे, हे ठरले असले तरी ‘वाटा’ कसा मिळवायचा याची तयारी मतांचा गठ्ठा बाळगणाऱ्यांकडून केली जात आहे. मतदार म्हणतात, सर्वच पर्याय खुले ४मताचा जोगवा मागण्यासाठी आलेल्या प्रत्येक उमेदवाराला उघड समर्थन मागू नका, माझे मत तुम्हालाच आहे, अशा शब्दात मतदारांकडून सर्वच पर्याय खुले ठेवण्यात येत आहे. उघड भूमिका घेऊन माझे नुकसान करू नका, आपले काही कमी-जास्त झाले तरी चालेल, हा शपथेवर शब्द आहे, अशी भूमिका विधान परिषदेतील बहूतांश मतदारांनी घेतली आहे. त्यामुळे उमेदवारांपुढचे कोडे अधिकच गुंतागुंतीचे बनत आहे. अशा झाल्या लढती वर्ष उमेदवार ४१९८० जगन्नाथ डांगे (वर्धा) - सुरेश लोणकर (वर्धा- यवतमाळ संयुक्त मतदारसंघ) ४१९८६ डॉ. पंजाबराव देशमुख (एस काँग्रेस) - कीर्ती गांधी (काँग्रेस) ४१९९२ विजय चोंढीकर (काँग्रेस) - बाळासाहेब चौधरी (अपक्ष) ४१९९८ एन. पी. हिराणी (राष्ट्रवादी काँग्रेस) - अविरोध निवड ४२००४ एन. पी. हिराणी (राष्ट्रवादी) - दीपक निलावार (अपक्ष) ४२०१० संदीप बाजोरिया (आघाडी) - दीपक निलावार (अपक्ष)