शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांपासून अस्तरीकरणाची प्रतीक्षा

By admin | Updated: August 29, 2014 00:07 IST

कुंभारकिन्ही प्रकल्पाचा कालवा पाझरत असल्याने तालुक्यातील बिजोरा येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे दरवर्षीच मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कालव्याचे अस्तरीकरण व्हावे, यासाठी डिसेंबर २०१३ मध्ये

दारव्हा : कुंभारकिन्ही प्रकल्पाचा कालवा पाझरत असल्याने तालुक्यातील बिजोरा येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे दरवर्षीच मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कालव्याचे अस्तरीकरण व्हावे, यासाठी डिसेंबर २०१३ मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी झालेल्या नुकसानीची मदत व कालव्याच्या अस्तरीकरणाचे आश्वासन देण्यात आले. मात्र नऊ महिने उलटूनही प्रशासनाकडून पूर्तता करण्यात आलेली नाही. कुंभारकिन्ही प्रकल्पाचा कालवा पाझरून बिजोरा येथील शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केल्याने कृषी सहाय्यक, तलाठी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त सर्वे केला होता. मात्र तीन महिने उलटूनही या नुकसानीचा अहवाल तहसीलदार यांना देण्यात आला नाही. दरम्यान, या कालव्यामुळे बोथ, बिजोरा, धूळापूर, हुसनापूर, राजूरा, माहुली, दारव्हा आदी ठिकाणच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन उभे केले. तेव्हा कालव्याचे अस्तरीकरण करून नुकसानीची मदत देण्यात येईल असे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र या आश्वासनाला नऊ महिने उलटूनही त्याची पूर्तता झालेली नाही. शिवाय कालव्याची डागडूजीही करण्यात आली नाही. त्यामुळे कालव्याचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात शिरत असून शेती पिकाचे नुकसान होत आहे. शेतात पाणी साचून राहात असल्याने जमिनीची पोतही खराब होत आहे. या संदर्भात अनेकदा तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे डिसेंबर २०१३ मध्येच कालव्याच्या गेटला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात आले. तब्बल १५ दिवस चाललेल्या या आंदोलनाने प्रकल्पाच्या पाण्याच्या भरोशावर रबीची पिके घेणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे कालव्याच्या पाण्याने होत असलेली पिकांची नासाडी आणि कालव्याच्या भरोशावर रबीची पिके घेणाऱ्या दोन गटात संघर्ष पेटला. संघर्ष पेटला की अधिकारी बैठका घेतात. शेतकऱ्यांची समजूत काढून आश्वासन देतात. मात्र या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटू शकतो. मदतीचे आश्वासन हवेतच विरल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)