शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
4
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
5
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
6
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
7
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
8
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
10
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
11
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
12
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
13
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
14
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
15
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
16
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
17
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
18
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
19
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
20
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा

By admin | Updated: October 25, 2015 02:26 IST

दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी वेतन त्वरित मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने केली आहे.

यवतमाळ : दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी वेतन त्वरित मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने केली आहे. संघटनेचे राज्य सरचिटणीस लक्ष्मण मोहुर्ले यांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन देता यावे यासाठी शासनाने सहायक अनुदान मंजूर करून वेळोवेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत ग्रामपंचायतीकडे वळते केले. आॅगस्ट २०१३ ते मार्च २०१५ या २० महिन्यांच्या कालावधीतील वेतनासाठीचे अनुदान जमा करण्यात आले. मात्र अजूनही बहुतांश कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. वेतनाची मागणी केल्यास कर वसुली करा, असे सांगितले जाते. मात्र यासाठी ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत नाही. एकीकडे असहकार आणि दुसरीकडे वेतन नाही अशा परिस्थितीत उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे. आता दिवाळी अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. आता तरी वेतन मिळावे अशी अपेक्षा त्यांनी केली आहे. निवेदन देताना राज्य सरचिटणीस लक्ष्मण मोहुर्ले जिल्हाध्यक्ष राजेंद्र राऊत, यवतमाळ तालुकाध्यक्ष मोरेश्वर आदमने, सचिव अरुण मेंढे, गुणवंत नरूले, शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)सेवाज्येष्ठता यादीत घोळजिल्हा परिषदेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियुक्तीसाठी १० टक्के आरक्षण देण्याकरिता सेवा ज्येष्ठता यादी दरवर्षी तयार केली जाते. यानुसार १ जानेवारी २०१५ ची यादी १ आॅक्टोबर २०१५ ला जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये ग्रामपंचायतीच्या सेवेत नसलेल्या लोकांचाही समावेश करण्यात आला आहे. १ जानेवारी २०१५ पूर्वी वयाची ४५ वर्षे पूर्ण झालेल्यांचीही नावे यामध्ये आहेत. जिल्हा परिषदेत नियुक्ती मिळालेल्या व्यक्तींनाही या यादीत सामावून घेतले आहे. एकूणच सेवाज्येष्ठता यादीत घोळ झाला असल्याचे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस लक्ष्मण मोहुर्ले यांनी म्हटले आहे.