शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राळेगाव बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 21:50 IST

येथील बसस्थानकाचे काम पूर्ण होऊन सहा महिने लोटले. मात्र या बसस्थानकाला अद्याप उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. उद्घाटनाअभावी सहा महिन्यांपासून प्रवाशांना बसची वाट बघत उघड्यावर उभे राहावे लागत आहे.

ठळक मुद्देप्रवासी उघड्यावर : बांधकाम पूर्ण होऊन सहा महिने लोटेले, तरीही प्रवाशांची कुचंबणा

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : येथील बसस्थानकाचे काम पूर्ण होऊन सहा महिने लोटले. मात्र या बसस्थानकाला अद्याप उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. उद्घाटनाअभावी सहा महिन्यांपासून प्रवाशांना बसची वाट बघत उघड्यावर उभे राहावे लागत आहे.दोन वर्षांपूर्वी येथील जुने बसस्थानक पाडून नवे बसस्थानक बांधण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र सहा महिन्यांत करावयाच्या बांधकामाला तब्बल दीड वर्षे लागले. आता कसे तरी एकदाचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या स्थानकाला उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. या ठिकाणावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यांना ऊन-वारा-पाऊस सहन करीत ये-जा करावी लागत आहे.बसस्थानकात अद्याप विजेसह अनेका कार्य बाकी आहे. त्यातच पुढील वर्षांचा विचार करून हे बसस्थानक बांधण्यात न आल्याने आत्ताच प्रवासी संख्येच्या दृष्टीने ते लहान पडू लागले आहे. ग्रामीण फेऱ्यांकरिता समोर काही फलाट बांधणे आवश्यक आहे. येथून दररोज १६० बसेस ग्रामीण व शहरी भागात ये-जा करतात. मात्र राळेगाव आगारात केवळ ३० बसेस उपलब्ध आहे. त्यातील काही बसेस भंगार झाल्या आहेत. आता लग्नसराई व उन्हाळ्यातील प्रवाशांची वाढती संख्या पाहता पाच नवीन बसेस या डेपोला उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.नव्या बसस्थानकात कँटीन, हॉटेल, बुकस्टॉलची सुविधा आहे. त्याचा लिलावही झाला आहे. मात्र शुभारंभाअभावी या सेवा सुरू होऊ शकलेल्या नाही. येथे साधे येथे वेळापत्रकही लावण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहतूक नियंत्रकांना प्रवाशांना वारंवार विचारणा करावी लागते.नवीन टायमिंग सुरू कराराळेगाव-नागपूर व्हाया-हिंगघाट, राळेगाव-चंद्रपूर व्हाया खैरी-मांढळी-वरोरा आणखी दोन-दोन टायमिंग सुरू करण्याची मागणी होत आहे. तसेच चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर रात्रीचे किमान दोन टायमिंग सुरू करावे व राळेगाव-यवतमाळ हे अंतर सहा किलोमीटर स्टेजप्रमाणे सातच स्टेजचे असताना घेतले जात असलेलया आठ स्टेजचे जादा भाडे रद्द करावे, अशी मागणी तालुका ग्राहक पंचायतने केली आहे.