शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वणीतील बारमालकांना आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:06 IST

१ एप्रिलपासून बंद झालेल्या वणीतील दारू दुकानांना आता सुरू होण्याचे वेध लागले आहे. ५ सप्टेंबरनंतर हळूहळू ही दुकाने सुरू होणार आहेत.

ठळक मुद्देदारू दुकाने सुरू होणार : दिवाळीपूर्वीच दुकानांची रंगरंगोटी सुरू, कामगारांमध्ये आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : १ एप्रिलपासून बंद झालेल्या वणीतील दारू दुकानांना आता सुरू होण्याचे वेध लागले आहे. ५ सप्टेंबरनंतर हळूहळू ही दुकाने सुरू होणार आहेत. गत पाच महिन्यापासून अडगळीत पडून असलेली ही दुकाने आता धूळ झटकू लागली आहे. दिवाळीपूर्वीच आता या बार व दारू दुकानांना रंगरंगोटी केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दारू विक्री सुरू करण्याचे आदेश दिल्याने बेरोजगार झालेल्या बारमधील कामगारांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.वणी व शिरपूर पोलिसांच्या हद्दीत १०१ दारू दुकाने होती. त्यात काही देशी दारू दुकानांचाही समावेश होता. मात्र न्यायालयाच्या आदेशाने त्यातील १०१ दुकाने बंद झाली होती. या कारवाईत केवळ ३० दुकाने बचावली. यात तीन ते चार देशी दारू विक्रीच्या दुकानांचा समावेश आहे. आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३१ आॅगस्टला दिलेल्या निर्णयानुसार महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दीतील सर्व दारू विक्रीची दुकाने सुरू होणार आहेत. वणी शहरातील जवळपास २४ दारू दुकाने ५ तारखेनंतर सुरू होण्याची चिन्हे आहे.उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील दुकाने मात्र तूर्तास सुरू होणार नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर वणी, मारेगाव व झरी या तालुक्यातील नगरपालिका व नगरपंचायत हद्दीतील बारचालकांनी तातडीने संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून एक वर्षासाठी परवाना शुल्क उत्पादन शुल्क विभागाकडे भरले आहे. अद्याप दारू दुकाने सुरू करण्याचा आदेश उत्पादन शुल्क विभागाने या बारचालकांना दिला नाही. उत्पादन शुल्क विभागाकडे उच्च न्यायालयाच्या त्या लेखी आदेशाची प्रत अद्याप पोहोचली नाही.संबंधित बारमालक दररोज उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात फोन करून ‘आदेश मिळाला का’, अशी विचारणा अधिकाºयांना करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने १५ डिसेंबर २०१६ रोजी एका निर्णयाद्वारे राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटरच्या आत मद्य विक्रीस बंदी घातली होती. त्यामुळे वणी उपविभागातील ११३ पैकी ९९ मद्य विक्रीची दुकाने बंद झाली होती. त्यातील केवळ ३४ दुकाने बचावली होती.