शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

महागावात ४० गावांना जोडरस्ता दुरूस्तीची प्रतीक्षा

By admin | Updated: January 15, 2015 23:00 IST

तालुका मुख्यालय आणि गावापासून हमरस्त्यावर येण्यासाठी रस्ता आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षात त्यांची दुरुस्तीच झाली नाही. त्यावरून आता चालताही येत नाही. अशा एक-दोन नव्हे तब्बल

संजय भगत - महागावतालुका मुख्यालय आणि गावापासून हमरस्त्यावर येण्यासाठी रस्ता आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षात त्यांची दुरुस्तीच झाली नाही. त्यावरून आता चालताही येत नाही. अशा एक-दोन नव्हे तब्बल ४० गावांतील जोडरस्त्यांना दुरूस्तीची प्रतीक्षा आहे. मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. तालुक्याच्या नकाशावर असूनही थार, अनंतवाडी या गावांना अद्यापही रस्ता नाही. ही गावे अजूनही दुर्लक्षित आहे. थार येथे रस्ता देण्याची मागणी जुनीच आहे. परंतु आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने ही समस्या सोडविली नाही. या गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. येथे टॅँकरने पाणी पुरविण्यात येते. रस्त्या अभावी टॅँकरसुद्धा गावात न्यायाचा कसा असा प्रश्न अद्यापही सुटला नाही. तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून दीडशे रस्ते जिल्हा परिषद बांधकाम विभाग तर उर्वरित हमरस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिनस्त आहेत. दोन्ही विभागाने काही वर्षात केलेल्या कामाची चाळणी झाली असून, पोचरस्त्याचे मात्र खस्ता हाल झाले आहेत. तालक्यातील घाणमुख, पिंपळगाव, काळी, टेंभी, बिजोरा, कोठारी उटी, तेलतवाडी, मोरथ, उटी ते गौळ रस्त्यावरील पुलाचे बांधकाम, वेणी धरण, हिवरा थार संगम, चिलगव्हाण, पोहंडळू, ईजनी ते दार्देवाडी, पोखरी, पेढी, मोहदी, माळवागद, हिवरदरी, कारंजखेड जुने, वाघनाथ, पिंपळवाडी तांडा, कोठारी, बेलदरी, नांदगव्हाण, बोथा, मोरथ, लेवा, अंबोडा, कलगाव, सवना ते वेणी, मुडाणा ते साधुनगर, वडद, हिंगणी ते पापलवाडी, धारेगाव, टेंभूरदरा, कमळवेणी, बारभाई तांडा आणि बरगेवाडी या चाळीस गावच्या पोच रस्त्याला दुरूस्तीची प्रतीक्षा आहे. जिल्हा नियोजन समितीच्या आगामी बैठकीत महागाव तालुक्यातील पोच रस्ते मार्गी लागतील अशी या गावच्या प्रत्येक नागरिकांना अपेक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)