शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

शनिवारपर्यंत करावी लागणार चिल्लरची प्रतीक्षा

By admin | Updated: November 18, 2016 02:29 IST

पाचशे आणि हजार रूपयांच्या जुन्या नोटांवर बंदी आदेशानंतर जिल्ह्यात चांगलीच उलथापालथ झाली आहे.

बोटावर लागणार शाई : आठ दिवसांत ३०० कोटींची चेंज खल्लासयवतमाळ : पाचशे आणि हजार रूपयांच्या जुन्या नोटांवर बंदी आदेशानंतर जिल्ह्यात चांगलीच उलथापालथ झाली आहे. आठ दिवसात तब्बल बाराशे कोटींची उलाढाल झाली आहे. तीनशे कोटींचे चिल्लर चलन बाजारात गेले आहेत. तर त्या ऐवजी नऊशे कोटींचे जुने चलन खात्यात जमा झाले आहे. जमा झालेल्या सहाशे कोटीतून पैसे परत मिळविण्यासाठी ग्राहकांची रेटारेटी सुरू आहे. मात्र आरबीआयकडील चिल्लर नोटा संपल्याने सध्या दोन दिवस जिल्ह्याला प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर नवीन चेंज देताना बोटाला शाई लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी एसबीआयच्या शाखांमध्ये होणार आहे.जिल्ह्यात २५७ शाखा आहेत. यामध्ये १४३ शाखा राष्ट्रीयकृत बँका आणि खासगी बँकांच्या आहेत. ८९ शाखा सहकारी बँकांच्या आहेत. तर २५ शाखा ग्रामीण बँकेच्या आहेत. जिल्ह्यातील विविध बँकापुढे आठ दिवसांपासून लांबच लांब रांगा आहेत. एका दिवसाला चार हजार रूपयांच्या नोटा एका व्यक्तीला बदलून देण्याच्या सूचना आहेत. यानुसार जिल्हयात आठ दिवसांमध्ये ३०० कोटींच्या नोटा बदलून ग्राहकांच्या हाती सुपूर्द झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर जुन्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटांच्या माध्यमातून नऊशे कोटी रूपये जमा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरबीआयकडून मिळणाऱ्या चिल्लर नोटा जिल्ह्यात पोहचण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत. जमा झालेली चिल्लर काही तासातच रिकामी झाल्याने दुपारनंतर एटीएमचे सेटर बंद झाले. तर अनेक बँकाकडील रक्कम दुपारनंतर कमी झाली. यामुळे काही खासगी बँकांना सर्वसामान्याच्या रोषांचा सामना करावा लागत आहे. (शहर वार्ताहर)गर्दी वाढल्यास तत्काळ कळवामंगळवारी पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम संतप्त ग्राहकाने फोडले. यामुळे जिल्हा प्रशासनाने पुढील अनर्थ टाळण्यासाठी सर्वच एटीएम धारकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. गर्दी वाढल्यास पोलीस बंदोबस्ताची मागणी पोलीसांकडे करण्याच्या सूचना आहेत. एका व्यक्तीला एकावेळा चार हजार रूपयांची चेंज करता यावी म्हणून बोटाला शाई लावण्याच्या सूचना जिल्ह्यात धडकल्या आहेत.