शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सदस्यांना बजेटची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 22:08 IST

जिल्हा परिषदेच्या सदस्यांना बजेट सभेची प्रतीक्षा आहे. २४ ते २७ मार्च दरम्यान बजेटची सभा होण्याचा अंदाज आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : सेस फंडातील निधीकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या सदस्यांना बजेट सभेची प्रतीक्षा आहे. २४ ते २७ मार्च दरम्यान बजेटची सभा होण्याचा अंदाज आहे.जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातर्फे दरवर्षी वार्षिक अंदाजपत्रक तयार केले जाते. या अंदाजपत्रकात योजनानिहाय तरतूद आणि संभाव्य खर्चाचा ताळमेळ बसविला जातो. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून कोणत्या योजना पूर्णत्वास जातील, याचा लेखाजोखा मांडला जातो. सोबतच जिल्हा परिषदेच्या मिळकतीतून प्राप्त होणाºया सेस फंडातूनही विविध योजनांसाठी तरतूद केली जाते.वित्त विभागाने सर्व विभागांना पत्र देऊन त्यांना संभाव्य खर्चाबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. कोणत्या योजनांसाठी किती रूपये लागतील, याचा अंदाज सादर करण्याचे आदेश दिले. सर्व विभागांकडून नियोजित खर्चाची माहिती मिळाल्यानंतर या महिन्याच्या शेवटी सर्व विभाग प्रमुखांची एकत्रित बैठक घेतली जाणार आहे. त्यात अंदाजपत्रकाचा कच्चा मसुदा तयार होणार आहे. नंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्थ समितीच्या सभेत या अंदाजपत्रकाला मूर्त स्वरूप दिले जाणार आहे.अर्थ समितीत अंदाजपत्रकावर साधकबाधक चर्चा झाल्यानंतर हे अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवले जाणार आहे. बजेटची सर्वसाधारण सभा दरवर्षी २४ ते २७ मार्च दरम्यान घेतली जाते. यावर्षीही २७ मार्चपूर्वी जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक मंजूर होणार आहे.मंजूर निधीही अखर्चितदरवर्षी सेस फंडातून शेतकरी, लाभार्थ्यांसाठी विविध योजनांवर लाखोंची तरतूद केली जाते. मात्र आर्थिक वर्ष संपत असतानाही हा निधी तसाच पडून राहतो, असा आजवरचा अनुभव आहे. मागीलवर्षीच्या अंदाजपत्रकात मंजूर करण्यात आलेला निधीही अद्याप पडून आहे. कृषी, समाजकल्याण, बांधकाम विभागाकडे सेसचा निधी अखर्चित आहे. हाच निधी खर्च झाला नसताना यावर्षी पुन्हा सेसमधून निधीची तरतूद केली जाणार आहे. हा निधी पुढील मार्चपूर्वी खर्ची घालण्यासाठी पदाधिकारी, सदस्यांनी आक्रमक होण्याची गरज आहे.