शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कृषी महाविद्यालयात प्रवेशाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 22:16 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत (पीकेव्ही) यवतमाळला शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर झाले असले तरी तेथे प्रवेशाची अद्याप प्रतीक्षाच आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे प्रयत्न : खासगीचा दर सात ते नऊ लाख, शेतकरी-शेतमजुरांची मुले वंचित

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत (पीकेव्ही) यवतमाळला शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर झाले असले तरी तेथे प्रवेशाची अद्याप प्रतीक्षाच आहे. खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार हे प्रवेश तातडीने सुरू व्हावे म्हणून प्रयत्नरत आहेत. तर दुसरीकडे शासकीय प्रवेशाला होणारा विलंब खासगी कृषी महाविद्यालयांकडून कॅश केला जात आहे. त्याच्या प्रवेशाचे दर ‘खासगी’त सात ते नऊ लाखांपर्यंत गेल्याची माहिती आहे.यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड, दारव्हा, कळंब व पांढरकवडा तालुक्यात चार खासगी कृषी महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेणे शेतकरी-शेतमजुरांच्या आवाक्याबाहेरील आहे. तेथील प्रवेशाचे लाखोंचे आकडे या गरीब शेतकºयांना गाठणे शक्य नाही. म्हणूनच या खासगी महाविद्यालयांवर मात करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी यवतमाळला शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर करण्यात आले. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील गरिबांच्या मुलांना कृषी शिक्षणासाठी येथे प्रवेश मिळावा, हा प्रामाणिक उद्देश या मागे होता. वाघापूर रोडवरील पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आवारात हे नवे कृषी महाविद्यालय थाटण्यात आले आहे. गाजावाजा करून या महाविद्यालयाचे उद्घाटन झाल्याने यंदाच्या सत्रापासूनच तेथे ‘बीएस्सी’च्या (अ‍ॅग्रीकल्चर) ६० जागांचे प्रवेश सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात अद्यापही हे प्रवेश सुरू झालेले नाहीत. या प्रवेशाची मुदत संपली असली तरी विशेष राऊंड घेण्याचा अधिकार शासनाला आहे. त्यामुळे अद्यापही कृषी शिक्षण घेऊ इच्छिणाºया गोरगरीब शेतकरी-शेतमजुरांच्या मुलांच्या आशा कायम आहेत.शासकीय प्रवेश लांबल्याची आयतीच संधी खासगी महाविद्यालयांना मिळाली. त्यामुळे काही खासगी कृषी महाविद्यालयांमधील प्रवेशाचे दर नऊ लाखांपर्यंत गेल्याचे सांगितले जाते. यावर्षी शासकीयची प्रवेश प्रक्रिया सुरूच होऊ नये, अशी या खासगी महाविद्यालयांची सुप्त इच्छा आहे. त्यासाठी तांत्रिक अडचणी पुढे केल्या जात असल्याची चर्चा आहे. जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची इमारत, शिक्षक वर्ग उपलब्ध असताना शासकीय प्रवेशाला विलंब केला जात असल्याने प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांमध्ये रोष पहायला मिळतो आहे.‘प्रवेश शासकीय, शिक्षण खासगी’तचा पर्यायइमारत व पायाभूत सुविधांची अडचण सांगून शासकीय कृषी महाविद्यालयातील प्रवेश लांबणीवर टाकले जात असले तरी या प्रवेशासाठी पर्याय उपलब्ध असल्याची बाब कृषी क्षेत्रातूनच पुढे आली आहे. शासकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचे प्रत्यक्ष शिक्षण खासगी महाविद्यालयात पूर्ण केले जाऊ शकते. हा पॅटर्न जामखेड येथे सुरु आहे. प्रवेश जामखेडात आणि प्रत्यक्ष शिक्षण राहुरीमध्ये घेतले जात आहे. तेथे आजी-माजी मंत्र्यांमध्ये कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशावरून वाद निर्माण झाला होता. त्याला उच्च न्यायालयाने स्थगनादेश दिला होता. त्यावर पर्याय म्हणून खासगी कृषी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले जात आहे.विदर्भातील शेतकºयांच्या मुलांसाठी सोय व्हावी म्हणून खास बजेटमधून शासकीय कृषी महाविद्यालयाला मान्यता मिळविण्यात आली. तेथील प्रवेश तातडीने सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्यात इमारत, पायाभूत सुविधा या सारख्या अडचणी येत आहेत. घाई केल्यास जामखेडप्रमाणे कोर्ट-कचेरी होण्याची व विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणूनच सावध पावले उचलून प्रवेश सुरू करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत.- मदन येरावारपालकमंत्री, यवतमाळ