शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रतीक्षा मृगाची

By admin | Updated: June 11, 2014 00:21 IST

गतवर्षी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले होते. रबी हंगाम गारपिटीने झोडपला होता. यंदा मात्र सारं काही सुरळीत होईल, या अपेक्षेसह खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर रोहिणी नक्षत्र कोरडे

पुसद : गतवर्षी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले होते. रबी हंगाम गारपिटीने झोडपला होता. यंदा मात्र सारं काही सुरळीत होईल, या अपेक्षेसह खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्याने संकट उभे ठाकले आहे. आता शेतकऱ्यांच्या नजरा मृगधारेकडे लागल्या आहेत. मृग नक्षत्र प्रारंभ होवून तीन दिवस होवूनही पाऊस न बरसल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.२५ मेपासून रोहिणी नक्षत्राला प्रारंभ झाला. उष्णता कमी होऊन नभ ढगांनी दाटून येत होते. पाऊस येईल, असे चित्र असताना सर्वांच्याच अपेक्षेवर पाणी पडले. आता पुन्हा सूर्य आग ओकू लागला आहे. पुसदचा पारा ४६ अंशावर गेला आहे. पाऊस आणि शेतीचे फार जवळचे नाते असले तरी मानवी व्यवहारांचा संपूर्ण अर्थशास्त्र नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे. ७ जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला. मृगाचे वाहन हत्ती आहे. त्यामुळे पावसाळ्याची सुरुवात दमदार होईल, अशी आशा जाणकारांची आहे. गतवर्षी रोहिणी नक्षत्रापासूनच पावसाने चांगली सुरुवात केली होती. त्यानंतरच्या सर्वच नक्षत्रांना समाधानकारक पाऊस पडला होता. यंदा रोहिणी नक्षत्र कोरडे गेले असले तरी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे वृत्त धडकताच शेतकऱ्यांनी जमिनी पेरणीसाठी तयार ठेवल्या आहेत. एकदाचा मृगाचा दमदार पाऊस पडला म्हणून पेरणीची वाट मोकळी होईल. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक संकटात सापडल्याने शेती व्यवस्था तोट्यात येत आहे. शिवाय पाण्याचा प्रश्नही बिकट आहे.शेतात पीक जोमावर असताना कुठले ना कुठले नैसर्गिक संकट येतेच. आता मान्सून लवकरच येणार असल्यामुळे शेतकरी बी-बियाणे आणि खतांची जुळवाजुळव करीत आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी कपाशीचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत असला तरी सोयाबीनचे पीक घेण्यामागचा ओढा मात्र कमी झालेला दिसत नाही. यंदा कपाशीला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक घेण्याचा निर्धार केला आहे. एकंदरित खरीप हंगामातील पेरण्यांकडे शेतकरी पेरणीपूर्व मशागती आटोपून सज्ज झाला आहे.यंदा बियाण्यांच्या किमती सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहे. कर्ज काढून अनेकांनी बियाण्यांची खरेदी केली आहे. बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याच्या तक्रारी वाढत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मृगाच्या धारांची प्रतीक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)