शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वाघाडी नदीला ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:51 IST

तालुक्यातून वाहणाऱ्या वाघाडी नदीवर दोन सिमेंट बंधारे बांधले जात असल्याने नदीला ‘अच्छे दिन’ येणार आहे. वाघाडी नदी जानेवारीतच कोरडी पडते. त्यामुळे अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसते. या नदीवर दहा गावांची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे.

ठळक मुद्देघाटंजी तालुका : नदीवर दीड कोटी रुपयांचे सिमेंट बंधारे

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तालुक्यातून वाहणाऱ्या वाघाडी नदीवर दोन सिमेंट बंधारे बांधले जात असल्याने नदीला ‘अच्छे दिन’ येणार आहे. वाघाडी नदी जानेवारीतच कोरडी पडते. त्यामुळे अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसते. या नदीवर दहा गावांची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. तसेच सिंचन अवलंबून आहे. मात्र नदी कोरडी पडत असल्याने शेतकºयांना सिंचन करता येत नाही. आता आमदार प्रा.राजू तोडसाम यांच्या पाठपुराव्यामुळे वाघाडी नदी पुनर्जीवित करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून संगम सावंगी येथे ५९ लाख रुपये खर्चून सिमेंट साठवण बंधारा बांधला जात आहे.इंजाळा येथेही ३८ लाखांचा सीमेंट साठवण बंधारा बांधला जाणार आहे. नुक्ती येथे आणखी दोन सिमेन्ट नाला बंधारा व खोलीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ४४ लाखांचा निदी मंजूर झाला. या सर्व कामांचे भूमिपूजन होऊन काम सुरू झाले आहे. या नदी पुनर्जीवन कार्यक्रमात एफईएस संस्था व सत्यजित जेना यांचे सहकार्य लाभल्याचे आमदार प्रा.तोडसाम यांनी सांगितले. त्यामुळे येत्या वर्षात वाघाडी नदी पुनर्जीवित होण्याचा विवास त्यांनी व्यक्त केला.भूमिपूजन सोहळ्याला भाजपााचे मधुसूदन चोपडे, राजू शुक्ला, जीवन मुद्देलवार, गणेश चव्हाण, अजय रेड्डी एल्टीवार, अविनाश ठाकरे, विनय जाधव, जावेद भाई, विनोद प्रधान, किरण गोल्लीवार, अविनाश आनंदिवार, स्वप्नील मानकर, सरपंच आत्राम व गावकरी अपस्थित होते.