शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

खडकडोह गावात शिरला वाघ

By admin | Updated: September 15, 2015 05:13 IST

झरी तालुक्यातील खडकडोह येथे रविवारी मध्यरात्री अचानक वाघ शिरला. या वाघाने तेथील एका बकरीला ठार केले, तर

वणी : झरी तालुक्यातील खडकडोह येथे रविवारी मध्यरात्री अचानक वाघ शिरला. या वाघाने तेथील एका बकरीला ठार केले, तर दुसऱ्या बकरीला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे ग्रामस्थ मात्र प्रचंड भयभीत झाले आहे.गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गेल्या महिन्यातसुद्धा याच परिसरातील दोन गायीला वाघाने फस्त केले होते. तेव्हापासून या परिसरात वाघाची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. अशातच रविवारी मध्यरात्री अचानक रामचंद्र नैताम यांच्या घराजवळील गोठ्यात वाघाने प्रवेश केला. तेथे बांधून असलेली त्यांची एक बकरी वाघाने फस्त केली. त्यानंतर सखाराम नांदेकर यांच्या घराजवळ बांधून असलेल्या बकरीवर वाघाने हल्ला केला. यात बकरी गंभीर जखमी झाली.रविवारी रात्री या परिसरात दमदार पाऊस झाला. त्यामुळे गावातील वीज गुल झाली होती. अशातच वाघाने गावात प्रवेश करून दोन बकऱ्यावर हल्ला चढविला. यात रामचंद्र नैताम यांचे पाच हजारांचे नुकसान झाले. ही बाब सकाळी लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी लगेच वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली. तेव्हा वनकर्मचाऱ्यांना गावकऱ्यांचा रोषाचाही सामना करावा लागला. या परिसरात नेहमीच वाघाचे हल्ले होत असून चिंचघाट, अडकोली, जुनोनी, पवनार आदी गावे वाघाच्या दहशतीत सापडली आहे. या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी मात्र वनविभाग सपशेल अयशस्वी ठरत आहे. वनविभागाच्या या दुर्लक्षीत धोरणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना शेती करणेसुद्धा कठीण झाले आहे. वारंवार वाघाचे हल्ले होत असल्याने शेतमजूरसुद्धा शेतात जाण्यासाठी तयार नसतात. त्यामुळे शेतीपिकांच्या उत्पादनावर परिणाम पडत आहे. वनविभागाने निद्रावस्थेतून जागे होऊन वाघाचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)महावितरणच्या अवकृपेमुळे नागरिकांमध्ये भिती४या परिसरात रात्रीच्या वेळी बहुतांश वेळा वीज राहत नाही. त्यामुळे गावात अंधार असतो. रविवारी रात्री वीज गेल्याने गावात वाघा आला, हे कुणालाही ठाऊक नव्हते. परंतु वाघाने गावात शिरून बकरी ठार केल्याचे कळताच ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. महावितरणने या परिसरात रात्रीच्या वेळी वीज सदैव सुरू ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.