शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव रोड ठाणेदाराची नियंत्रण कक्षात बदली

By admin | Updated: April 21, 2017 02:14 IST

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या पथकाने येथील शारदा चौकात पोलीस चौकीनजीकच्या

धाडीनंतर कारवाई : ट्राफिक पीआयकडे प्रभारयवतमाळ : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या पथकाने येथील शारदा चौकात पोलीस चौकीनजीकच्या जुगार अड्ड्यावर धाड यशस्वी केली. या प्रकरणी संबंधित वडगाव रोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार देविदास ढोले यांची बुधवारी रात्री नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. मंगळवारी महानिरीक्षकांच्या पथकाने राजरोसपणे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड घातली. तेथून आठ जणांना अटक करुन ३८ हजार रुपये जप्त केले. यातील दोघे अद्याप फरार आहे. या धाडीने वडगाव रोड पोलीस, एसडीपीओंचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. या धाडीमुळे कुणाकुणावर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार, याची चर्चा पोलीस दलात सुरू असतानाच पहिली कुऱ्हाड वडगाव रोडचे ठाणेदार देविदास ढोलेंवर कोसळली. त्यांची उचलबांगडी करून नियंत्रण कक्षात बसविण्यात आले. विशेष असे ढोले हे २० एप्रिलपासून रजेवर जाणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांची बदली केली गेली. वडगाव रोड ठाणेदार पदाची अतिरिक्त जबाबदारी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ढोले यांच्या चौकशीचे आदेश महानिरीक्षकांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यात शारदा चौकातील जुगाराबाबत वडगाव रोडची कुंडली काढली जाणार आहे. ढोलेंवरील कारवाई बदलीवर थांबते की, आणखी पुढे जाते, याकडे पोलीस यंत्रणेच्या नजरा आहे. महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना निलंबन कारवाईचे संकेत दिले होते, हे विशेष. (जिल्हा प्रतिनिधी) धाडीमागे ‘अर्थ’कारण लपल्याची चर्चाशारदा चौकातील याच जुगार अड्ड्यावर तत्कालीन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी धाड घातली होती. त्यावेळी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करून अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. यावेळी थेट महानिरीक्षकांच्या पथकाने धाड घातल्याने कारवाई होणार म्हणून संबंधित बीटचे अधिकारी-कर्मचारी धास्तावले होते. मात्र लहान कर्मचाऱ्यांना दोषी न धरता थेट वरिष्ठावर कारवाई झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जुगारावरील या धाडीमागे ‘अर्थ’कारण लपले असल्याची चर्चाही पोलीस वर्तुळातून ऐकायला मिळते आहे.