शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

झालेल्या मतदानापेक्षा मोजलेले मतदान अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 21:44 IST

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात ११ लाख ६९ हजार ८०६ मतदारांनी मतदान केले होते. आयोगानेच ही आकडेवारी जाहीर केली होती. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीनंतर ११ लाख ६९ हजार ९७७ मते मोजण्यात आल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाच्याच वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅपवर जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । यवतमाळ-वाशिम लोकसभेत संभ्रम, वाशिम क्षेत्रात ३९१ जादा, राळेगावात ३२९ कमी मते मोजली

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात ११ लाख ६९ हजार ८०६ मतदारांनी मतदान केले होते. आयोगानेच ही आकडेवारी जाहीर केली होती. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीनंतर ११ लाख ६९ हजार ९७७ मते मोजण्यात आल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाच्याच वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅपवर जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे १७१ जादा मते आली कोठून असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.एकीकडे ईव्हीएमबाबत बऱ्याच समाजघटकांंना संशय असताना, राजकीय कार्यकर्त्यांच्या तक्रारी असताना मतदानाच्या आकडेवारीतील तफावतीने संभ्रम वाढला आहे. निवडणूक आयोगाचे वोटर टर्न आऊट हे मोबाईल अ‍ॅप, वेबसाईटवरील आकडेवारीत तफावत दिसत आहे. त्यातही वाशिम विधानसभा मतदारसंघात ३६१ मते जास्त तर राळेगाव विधानसभा मतदारसंघात ३२९ मते कमी दाखविल्याने संभ्रम वाढला.कंट्रोल युनिटमधून आलेले मतदानच बरोबर : गुल्हानेआयोगाच्या अ‍ॅपवर मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत दिसत आहे, हे बरोबर आहे. एखाद्या मतदान केंद्रावरील प्रिसायडिंग आॅफिसरने आकडेवारी भरताना चूक केल्यास अशी तफावत दिसू शकते. समजा एखाद्या ठिकाणी ४२५ मतदान झाले आणि कर्मचाऱ्याने ४१५ आकडा भरला तर एकूण मतदानाच्या आकड्यात फरक पडतो. त्यातूनच आयोगाच्या अ‍ॅपवर माहिती नोंदविली जाते. मात्र, मतमोजणीत ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटमधून बाहेर आलेलाच खरा मतदानाचा आकडा आहे, अशी माहिती यवतमाळचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

टॅग्स :Votingमतदान