शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

दिग्रसचा स्वर बनला महाराष्ट्राचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:28 IST

सारेगामापा स्पर्धेत माझा महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक आला. पण या विजयापेक्षाही स्पर्धेदरम्यान परीक्षक बेलातार्इंनी दिलेली शाबासकी माझ्यासाठी संस्मरणीय ठरणार आहे.

ठळक मुद्देउज्ज्वल गजभार बेलातार्इंची शाबासकी स्पर्धेच्या बक्षिसापेक्षाही मोठी, शास्त्रीय संगीताचा ‘बेस’ हवाच

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : सारेगामापा स्पर्धेत माझा महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक आला. पण या विजयापेक्षाही स्पर्धेदरम्यान परीक्षक बेलातार्इंनी दिलेली शाबासकी माझ्यासाठी संस्मरणीय ठरणार आहे. माझ्या रूपाने मराठी सिनेसृष्टीला नवा गायक मिळाला, हे त्यांचे शब्द माझ्या पुढच्या प्रयत्नांना बळ देणार आहे... टीव्ही वाहिनीवरील सारेगामापा स्पर्धेत चमकलेला हिरा ‘लोकमत’शी बोलत होता. उज्ज्वल गजभार हे या दमदार गायकाचे नाव.टीव्हीवरच्या चकाचक कार्यक्रमात आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या खेड्यातला पोरगा चमकला. महाराष्ट्रभरातून आलेल्या एकापेक्षा एक सरस गायकांना मागे टाकत तो महागायक ठरला. उज्ज्वल मोतीरामजी गजभार हे त्याचे नाव. दिग्रसजवळच्या देऊरवाडा या पुनवर्सित गावातला त्याचा जन्म. अशा छोट्याशा खेड्यातल्या उज्ज्वलच्या सुरांनी महाराष्ट्राला मोहीत कसे केले? वाचा त्याच्याच शब्दात... ‘मी वयाच्या तिसºया वर्षीच गायन सुरू केले. लहान असताना कोणतीही वस्तू घ्यायची अन् वाजवायची, हाच माझा उद्योग होता. साधा ओरडलो तरी त्यात इतरांना सूर असल्याचे जाणवायचे. त्यातूनच माझ्या आईवडीलांनी माझ्यातला ‘गायक’ ओळखला असावा आणि त्यांनी मला संगीताचे शिक्षण द्यायला सुरूवात केली..’वडील मोतीरामजी चांगले गातात. त्यांनीच उज्ज्वलला गायनाचे प्राथमिक धडे दिले. नंतर घाटंजी येथील पं. विजय दुरुतकर आणि दीपक निळे यांच्याकडे उज्ज्वलने शास्त्रीय संगीताचा रितसर रियाज केला. दिग्रसच्या विद्यानिकेतनमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले, दिनबाई विद्यालयात आठवी ते दहावी आणि बुटले महाविद्यालयात अकरावी, बारावीचे शिक्षण घेतल्यावर उज्ज्वल सध्या पुण्याच्या भारती विद्यापीठात संगीत विषयात बीए करतोय. रविवारी सारेगामापा स्पर्धेत महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकावल्यावर ‘लोकमत’शी बोलताना तो म्हणाला, दुरुतकर गुरुजींसोबत यवतमाळात भरपूर कार्यक्रम केले. पण गुरुजी गेले तेव्हापासून मी गावाकडे गेलोच नाही. पुणे, औरंगाबाद, मुंबईसारख्या शहरांतही कार्यक्रम केले. पण जाहीर कार्यक्रमातला परफॉर्मन्स आणि टीव्हीवरच्या स्पर्धेतला परफार्मन्स यात जमीन आसमानाचे अंतर आहे. तिथे हजार-दोन हजार श्रोते असतात. पण ही स्पर्धा राज्यातील हजारो प्रेक्षक बघत असतात. शिवाय, आपला प्रत्येक सुरावर तज्ज्ञांची बारीक नजर असते. म्हणूनच या स्पर्धेतून बरेच काही शिकताही आले.यवतमाळ असो की विदर्भ, खेड्यातल्या पोरांमध्येही टॅलेंट आहेच. पण खंत एवढीच की, विदर्भात शास्त्रीय संगीत फारसे ऐकायला मिळत नाही. आपले लोक गझल, कव्वाली, भजन एवढ्यावरच रमतात. पण गायन क्षेत्रात पुढे जायचे असेल तर शास्त्रीय संगीताचा ‘बेस’ हवाच. मी महागायक ठरू शकलो नाही, माझा दुसरा क्रमांक आला. त्याचे कारण, माझ्या गायनात फक्त मराठमोळी झलक दिसते. घराण्याच्या तालमीचे अंग त्यात दिसत नाही. मला जाणवलेली ही कमतरताही मी पॉझिटिव्हली घेतलीय. पुढे तसा सराव करेल. सारेगामा स्पर्धेतील आवडते गीत कोणते असे विचारल्यावर उज्ज्वल म्हणाला...अंधार दाटला बेभानल्या दिशाचकव्यात उभी, अंगार उरी विझलेलाही साद की तुझा आभास साजनागंधाळून येई देह पुन्हा मिटलेलाविझल्या विझल्या राखेत नवावणवा कुठला उमजेना...