शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पालकांची विवेकानंद विद्यालयात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:11 IST

खासगी शिक्षण संस्थेने दहाव्या वर्गाच्या शिक्षकाची ऐन सत्राच्या मध्येच बदली केल्याने संतप्त पालकांनी गुरुवारी येथील विवेकानंद विद्यालयात धडक दिली.

ठळक मुद्देदहावीच्या परीक्षेच्या तोंडावर शिक्षकाची बदली : सोमवारपासून शाळाच उघडू न देण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खासगी शिक्षण संस्थेने दहाव्या वर्गाच्या शिक्षकाची ऐन सत्राच्या मध्येच बदली केल्याने संतप्त पालकांनी गुरुवारी येथील विवेकानंद विद्यालयात धडक दिली. बदली रद्द न केल्यास सोमवारपासून शाळाच उघडू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे दोन तास शाळेच्या आवारात तणावाचे चित्र होते.येथील विवेकानंद विद्यालयात दहाव्या वर्गाला इंग्रजी शिकविणारे शिक्षक विवेक अलोणे यांची बदली करण्यात आली. ही माहिती कळताच दहाव्या वर्गाचे विद्यार्थी विचलित झाले. त्यांनी पालकांना माहिती दिल्यावर त्यांनाही धक्का बसला. दोन-तीन महिन्यातच दहावीची परीक्षा असताना शिक्षकाची बदली केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी गुरुवारी १२ वाजताच्या सुमारास शाळेत धडक दिली. पालकांचा रुद्रावतार पाहून शाळेने दहाव्या वर्गाला सुट्टी दिली. सुट्टी का दिली, याचे कारणच न समजल्याने विद्यार्थी शाळेच्या आवारातच घुटमळत राहिले. त्यामुळे पालकांची गर्दी, त्यातच विद्यार्थ्यांचा गोंगाट असे चित्र निर्माण झाले.या प्रकरणात संस्था राजकारण करीत असल्याचा आरोपही पालकांनी केला. पालक शिक्षकाची बदली रद्द करण्याची मागणी करीत असतानाच संबंधित शिक्षकाला बदलीचा आदेशही देण्यात आला. त्यामुळे पालकांचा संताप वाढला. मुख्याध्यापकांची भेट घेतली असता, घोडखिंडी येथील शिक्षकाचा अपघात झाल्यामुळे त्या शाळेला शिक्षकाची गरज आहे. त्यामुळे अलोणे यांची तेथे बदली करण्यात आली, असे मुख्याध्यापक मोहन केळापुरे यांनी सांगितले. परंतु, घोडखिंडीला ज्या पद्धतीने गरज आहे, तशीच गरज इथल्या विद्यार्थ्यांना नाही का, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला. सत्र संपल्यानंतर शिक्षकांची बदली केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांना भेटणारशैक्षणिक सत्राच्या मध्येच शिक्षकांच्या बदल्या झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, म्हणून राज्य शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पुढे लोटली आहे. मात्र विवेकानंद विद्यालय दहावीच्या शिक्षकाची बदली अचानक का करीत आहे, असा प्रश्न पालकांनी केला. याबाबत संस्थाचालकांशीही पालकांनी संपर्क केला. त्यावर शनिवारी सर्वजण एकत्र बसून निर्णय घेण्याचे आश्वासन पालकांना देण्यात आले. परंतु, शनिवारपर्यंत शिक्षकाचा बदली आदेश रद्द न केल्यास सोमवारपासून शाळाच उघडू देणार नाही, तसेच जिल्हाधिकाºयांना भेटून दाद मागण्यात येईल, असा इशारा दीपक केणे, कौस्तुभ मोहदरकर, अतुल खंडेश्वर, सोनल करोडदेव, मेघा चव्हाण, किरण राठोड, मिना ढोले, मनिषा हिरोळकर, संगीता गिरी, कांता मेश्राम, उषा वाघाडे, विनोद सवाई आदी पालकांनी दिला.