शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वणीतील आरोग्य यंत्रणा कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:36 IST

सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने शासकीय आरोग्य सेवेचे जाळे तयार केले आहे. मात्र कर्मचाऱ्यांचा तुटवडा व त्यांच्या अनास्थेमुळे शासकीय आरोग्यसेवा कुचकामी ठरत आहे.

ठळक मुद्देकर्मचाºयांचा तुटवडा : गोरगरिबांना धरावी लागते खासगी दवाखान्याची वाट

ऑनलाईन लोकमतवणी : सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने शासकीय आरोग्य सेवेचे जाळे तयार केले आहे. मात्र कर्मचाऱ्यांचा तुटवडा व त्यांच्या अनास्थेमुळे शासकीय आरोग्यसेवा कुचकामी ठरत आहे. परिणामी गोरगरिब जनतेलाही खासगी दवाखान्याची वाट धरून उपचार करून घ्यावे लागत असल्याने गोरगरिबांचे आर्थिक बजेट ढासळत आहे.तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी शहरात ग्रामीण रूग्णालय, तर ग्रामीण भागात कायर, शिरपूर, राजूर व कोलगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र देण्यात आले आहे. या केंद्रामध्ये बाह्यरूग्ण तपासणी, आंतर रूग्णसेवा, आरोग्य शिबिरे, लसीकरण व आरोग्यविषयक जनजागृती करणे, या बाबीकडे लक्ष देणे बंधनकारक आहे. मात्र आरोग्य केंद्रात असणारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचा तुटवडा आणि कार्यरत कर्मचाऱ्यांची सेवा देण्याची अनास्था, यामुळे गोरगरिब जनतेला आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त होत आहे.ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राचीही अवस्था याहून वेगळी नाही. शिरपूर आरोग्य केंद्रात नुकतेच नसबंदी शस्त्रक्रियेचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात काही गोरगरिब महिलांनी शस्त्रक्रिया करून घेतल्या. मात्र त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. स्वच्छ पाण्याची सोयसुद्धा करण्यात आली नव्हती. पंचायत समिती सदस्या वर्षा पोतराजे यांनी केंद्रातील व्यवस्थेची पाहणी केली असता, आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार त्यांना दिसून आला. तेव्हा त्यांनी तातडीने काही व्यवस्था करून देण्यास भाग पाडले. कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तर केवळ शोभेचीच वस्तू ठरत आहे. या केंद्रातील काही कर्मचारी सतत नशेत असल्याने तेथे महिला कर्मचाऱ्यांचीही सुरक्षितता राहिली नाही. शिरपूर व कोलगाव येथे वैद्यकीय अधिकारी तर रूग्णांना दिसणे भाग्याचे समजले जाते. बरेचदा केंद्रातील आरोग्य कर्मचारीच बाह्य रूग्ण तपासणी करताना आढळून येते.राजूर येथे मोठ्या प्रमाणात कामगार आहे. त्यामुळे राजूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र उपयुक्त ठरणारे समजले जाते. मात्र या केंद्रातही रूग्णांना समाधानकारक सेवा मिळत नाही. कायरचे आरोग्य केंद्रातही कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने तेथील आरोग्य सेवा ढेपाळली आहे. आरोग्य उपकेंद्रात, तर आरोग्य कर्मचारी कधीच हजर राहत नसल्याने ही केंद्रे मोकाटच अवस्थेत आहे. या सर्व आरोग्य केंद्रावर नियंत्रण ठेवणारे तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय तरी कशावर लक्ष ठेवतात, हे समजण्यास मार्ग नाही.ग्रामीण रुग्णालय बनले समस्यांचे माहेरघरवणीचे ग्रामीण रूग्णालय तर समस्यांचे माहेरघरच बनले आहे. बाह्यरूग्णावर थातुरमातूर उपचार करणे, रूग्णांना रेफर करून वाट दाखविणे, या मार्गाचा अवलंब केला जात आहे. स्वच्छतेचा अभाव, सुरक्षेचा अभाव, यामुळे रूग्णांना उपचारासाठी जावे की नाही, हा विचार येतो. येथे काही विशेष तज्ज्ञांच्या कंत्राटी करारावर नियुक्त्या केल्या आहे. मात्र त्यांच्या सेवेचा रूग्णांना कधीच लाभ मिळत नाही. त्यांच्या वेतनावर दरमहा लाखोचा खर्च होत आहे.