शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

भरपावसात विराट दर्शन

By admin | Updated: September 26, 2016 02:35 IST

धो-धो कोसळणाऱ्या पावसात मराठा-कुणबी समाजबांधवांनी आपल्या मागण्यांसाठी विराट दर्शन मोर्चाच्या माध्यमातून घडविले.

यवतमाळात घडला इतिहास : मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चा यवतमाळ : धो-धो कोसळणाऱ्या पावसात मराठा-कुणबी समाजबांधवांनी आपल्या मागण्यांसाठी विराट दर्शन मोर्चाच्या माध्यमातून घडविले. प्रत्येकासाठी खरेच ऐतिहासिक ठरावा असा हा क्षण होता. कधी नव्हे ती महिला आणि युवतींची लक्षणीय उपस्थिती मोर्चाचे वैशिष्ट ठरले. लाखोंच्या संख्येत उपस्थिती असूनही येथील शिस्तबद्धता प्रशिक्षित दलातील सदस्यांनाही लाजविण्यासारखी होती. समता मैदानावर (पोस्टल ग्राऊंड) सकाळपासून जिल्हाभरातील मराठा-कुणबी समाजबांधव दाखल होऊ लागले. मैदान खचाखच भरल्यानंतर प्रवीण देशमुख यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले. उरी हल्ल्यातील शहीद आणि कोपर्डीसह देशभरात अत्याचाराने प्राण गमवावा लागलेल्या तरुणींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिजाऊ वंदना झाली. १ वाजताच्या सुमारास महिला, युवती यांच्या पुढाकारात मोर्चाची सुरुवात झाली. हा मोर्चा पुनम चौक, हनुमान आखाडा चौक, पाचकंदिल चौक, जाजू चौक, अणे महिला महाविद्यालयासमोरून, दत्त चौक, नेताजी चौक, बसस्थानक चौक असे मार्गक्रमण करीत एलआयसी चौकात पोहोचला. मोर्चा निघताना पावसाला जी सुरूवात झाली, ती संपेपर्यंत कायम होती. मात्र, मराठा-कुणबी समाजबांधवांनी पावसातही मोर्चाची शिस्त मोडली नाही. एलआयसी चौकात मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. मनिषा काटे, सोनाली वादाफळे, समृद्धी राऊत, मयुरी कदम, सृष्टी दिवटे, श्रावणी कडू या तरुणींच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवलेसुद्धा उपस्थित होते. त्यानंतर मोर्चाला स्नेहल टोम्पे (लांडगे), रूबाली शिर्के, शितल साळुंके, सृष्टी दिवटे, साईश्वरी गायकवाड यांनी संबोधित केले. हा मोर्चा कुणा जाती-धर्माविरोधात नसून न्याय्य मागण्यांसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कोपर्डीच नव्हेतर त्यासारख्या इतर कुठल्याही घटनांमध्ये आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, प्रशासनाने संपूर्ण प्रक्रिया तातडीने पूर्ण करून या आरोपींना फासावर लटकवावे, असा एकमुखी सूर या तरुणींच्या भाषणाचा होता. या सभेचे आभार वैदेही देशमुख हिने मानले. संचलन कैलास राऊत यांनी केले. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. (कार्यालय प्रतिनिधी)