शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे बंदला हिंसक वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:46 IST

मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे हिंसक वळण मिळाले आहे.

ठळक मुद्देउपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांच्यावर दगडफेकपोलीस शिपाई विलास शेळके यांना हृदयविकाराचा झटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे हिंसक वळण मिळाले आहे.येथे आज बुधवारी सकाळी बाजारपेठेत जमलेल्या मोर्चेकऱ्यांनी मुख्यमंत्र् यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनकांनी केलेल्या दगडफेकीत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांनाही त्याचे लक्ष्य बनवण्यात आले. मात्र त्यांनी हेल्मेट घातले असल्याने पुढील अनर्थ टळला.तालुक्यातील विडूळ येथे सकाळी ११ च्या सुमारास लोखंडी रॉड व काठ्यांनी आंदोलकांनी बसची तोडफोड केली. यात चालकासह पाच प्रवासी जखमी झाले. काही खाजगी वाहनांचीही तोडफोड संतप्त आंदोलकांनी केली.उमरखेडमध्ये माहेश्वरी चौकात आंदोलकांनी दगडफेक केल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या दगडफेकीत दराटीचे ठाणेदार सुभाष उन्हाळे यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला तर दोन नागरिकही जखमी झाले. मोर्चेकऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुसदवरून जादा पोलीस कुमक मागवण्यात आली. शिवसेनेचे नेते व माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनाही आंदोलकांनी धक्काबुक्की केली.यावेळी मोर्चेकऱ्यांनी काकासाहेब शिंदे यांना सामुहिक श्रद्धांजली वाहिली. तसेच वकिलांच्या संघटनेने तहसीलदारांना आपले निवेदन दिले.या आंदोलनादरम्यानच येथील पोलीस ठाण्यातील शिपाई विलास शेळके यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी तात्काळ नांदेड येथे हलवण्यात आले. या संपूर्ण परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा