शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण नागरिक चाखतोय रानमेव्याचा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 15:02 IST

Yawatmal News उन्हाळ्याची चाहुल लागताच आता ग्रामीण भागातील ग्रामस्थ रानमेव्याचा गोडवा चाखताना दिसत आहेत.

 लोकमत न्यूज नेटवर्क  यवतमाळ  : निसर्गाची किमया खूप सुंदर आहे तसेच निसर्गाने अनेक चमत्कार केले. त्या चमत्कारात वनसंपदेचा समावेश होताे. आज वनसंपदेत विविध प्रकारची वन औषधे व झाडे पाहायला मिळतात. त्या झाडांमध्ये मोह, चिंच, आवळा, चारबी, बायवा, टेंबूर, साग, खैर, सालाई, चाराई व इतर झाडेही आढळून येतात. उन्हाळ्याची चाहुल लागताच आता ग्रामीण भागातील ग्रामस्थ रानमेव्याचा गोडवा चाखताना दिसत आहेत.

मोह, चाराई, चिंच, टेंबूर व कविठ ही मानवाला नगदी पैसे देणारी झाडे आहेत. ग्रामीण भागात लग्न समारंभात चिंचेचा वापर कढी करण्यासाठी केला जातो, तर मोहाच्या झाडापासून मोहफुले व टोरी ही फळे किंवा बिया मिळतात. यापासून विविध पदार्थ केले जातात. खैरापासून कात, तर कविठाचा उपयोग ग्रामीण भागात मानवाच्या खाद्य पदार्थात केला जातो. कविठापासून लोणचे, चटणी, मुरब्बा बनविला जातो तसेच टेंबूर आणि चारबीचा वापर खाण्यासाठी करतात. त्यामुळे या सर्वांना रानमेवा असे म्हटले जाते.

सध्या जंगलातील टेंबूर व कविठ ही फळे निघायला सुरुवात झाली आहे, तर चारबी निघायला सुरुवात होणार आहे. कविठ, चिंच, सालाई व खैर ही सर्व झाडे जंगलात आढळून येतात. यामधील चारबी खायला गोड व आंबट असते, तर टेंबूर गोड आणि चिकूपेक्षाही पौष्टिक व चविष्ट असतात. चारबीला २० वर्षाच्या आधी ग्रामीण भागात चारांच्या बियांना फोडून बियांमधून निघणाऱ्या पौष्टिक पदार्थांपासून विविध पदार्थ केले जात होते. गुळाच्या पोळ्यामध्ये आणि लाडवात लाडू बनविताना ते टाकले जात. शहरी भागात रानमेव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रानमेव्याची चव शहरी लोक कितीही पैसे देऊन आनंदाने चाखतात. शहरात या फळालाही भक्कम मागणी असते; परंतु झाडतोडीमुळे रानमेवा मिळणे आजघडीला कठीण जात आहे.

टॅग्स :forestजंगल