शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

गावकऱ्यांनी स्वीकारले ग्रामस्वच्छतेचे व्रत

By admin | Updated: December 13, 2014 22:48 IST

स्वच्छता म्हणजे आरोग्याचा मूलमंत्र. सार्वजनिक स्वच्छता तर स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने गावात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते.

ढाणकी : स्वच्छता म्हणजे आरोग्याचा मूलमंत्र. सार्वजनिक स्वच्छता तर स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने गावात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते. हे साम्राज्य नष्ट करण्याचे व्रत वारकरी संप्रदायाने हाती घेतले. अन् पाहता पाहता गावकऱ्यांच्या प्रतिसादाने आता ढाणकी गाव चकाचक झाले आहे. उमरखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असं बिरुद मिरवणारं हे गाव स्वच्छतेच्या बाबतीत मात्र अगदी नामनिराळचं. गावात जागोजागी प्लास्टिक विखुरलेले, कचऱ्याचे ढीग, भरलेली गटार. सर्व चित्र एकदम बकाल. ढाणकीच्या आर्थिक-सांस्कृतिक समृद्धीला न भोवणारं हे चिऋ बदलण्याचा निर्धार वारकरी संप्रदायाने केला. डॉ.लक्ष्मीकांत रावते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. अन् पाहता पाहता चित्र पालटलं.आज सर्व गावं या मोहिमेत सामील झालं आहे. विविध व्यापारी, कामगार, विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स संघटना ग्रामस्वच्छता मोहिमेत हिरीरीने भाग घेत आहेत. सकाळी ६ ते ८ या वेळात ग्रामस्वच्छता उपक्रम चालत आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचाही सहभाग मिळत आहे.ग्रामस्वच्छता मोहिमेमुळे ढाणकीचा चेहरामोहरा बदलला आहे. रस्ते चकाचक झालेले पाहायला मिळत असून विस्तीर्ण भासत आहेत. रस्त्यातील कचऱ्याचे ढीग नष्ट झालेले आहेत. तुंबलेली गटारंही वाहताना दिसत आहेत. येथे पाहायला मिळणारी स्वच्छता ढाणकीच्या वैभवनात भर घालणारी आहे. शिवाय ढाणकीत घडणाऱ्या बऱ्यावाईट घटनांचे पडसाद आजूबाजूच्या पाच-पंचवीस गावात उमटत असल्याने या स्वच्छता मोहिमेचा जागर त्या गावातही उमटेल, अशी आशा आहे. (वार्ताहर)